तेलगू देशम पक्षाचा तेलंगणा विधानसभेत सुफडासाफ, शेवटच्या दोन आमदारांनीही केले पक्षांतर


माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशम पक्षाचा तेलंगणा विधानसभेत सुफडासाफ झाल आहे. टीडीपीच्या शेवटच्या दोन आमदारांनीही पक्षांतर करत तेलंगणा राष्ट्रीय समितीमध्ये प्रवेश केला आहे.Telugu Desam Party big bolt in Telangana Assembly, last two MLAs also defected


विशेष प्रतिनिधी 

हैद्राबाद : माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशम पक्षाचा तेलंगणा विधानसभेत सुफडासाफ झाल आहे. टीडीपीच्या शेवटच्या दोन आमदारांनीही पक्षांतर करत तेलंगणा राष्ट्रीय समितीमध्ये प्रवेश केला आहे.

तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीत टीडीपीचा दारुण पराभव झाला होता. अश्वरपेटमधून मेचा नागेश्वर राव आणि साथुपल्लीमधून संद्रा वेंकट विरय्या हे दोन आमदारच निवडून आले होते. विरोधी पक्षात असल्यामुळे आपल्या मतदारसंघातील जनतेला न्याय देऊ शकत नाही.



त्यामुळे सत्ताधारी पक्षात गेल्यास जनतेची सेवा चांगल्याप्रकारचे करणे शक्य होईल असे म्हणत नागेश्वर राव यांनी तेलंगणा राष्ट्रीय समितीमध्ये प्रवेश केला.त्यामुळे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी चर्चा केल्यानंतर दोन्ही आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र देऊन आपला पक्षच तेलंगणा राष्ट्रीय समितीमध्ये विलिन करून टाकला.

यामुळे तेलंगणा राष्ट्रीय समितीचे ११९ संख्याबळ असलेल्या विधानसभेत १११आमदार झाले आहेत. एआयएमआयएमचे सात, कॉँग्रेसचे सहा आणि भाजपाचे दोन आमदार आहेत. उर्वरित अपक्षा आमदारही तेलंगणा राष्ट्रीय समितीचे सहयोगी सदस्य बनले आहेत.

२०२८ च्या विधानसभा निवडणुकीत टीआरएसने ८८ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर कॉँग्रेसच्या १२ आमदारांनी टीआरएसमध्ये प्रवेश केला होता.

Telugu Desam Party big bolt in Telangana Assembly, last two MLAs also defected

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात