तेलगू देशम पक्षाचा जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार, खुल्या वातावरणात निवडणुका होण्याबाबत व्यक्त केली शंका

आंध्र प्रदेशात खुल्या वातावरणात निवडणुका होतील की नाही याबाबत शंका व्यक्त करत तेलगू देशम पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार घातला आहे. तेलगू देशम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी ही घोषणा केली.Telugu Desam Party boycotts Zilla Parishad-Panchayat Samiti elections, expresses doubts about open elections


विशेष प्रतिनिधी

अमरावती : आंध्र प्रदेशात खुल्या वातावरणात निवडणुका होतील की नाही याबाबत शंका व्यक्त करत तेलगू देशम पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार घातला आहे. तेलगू देशम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी ही घोषणा केली.

निवडणूक आयोगाने कालच आंध्र प्रदेशातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा केली होती. तेलगू देशम पक्षाच्या पॉलीट ब्युरोतील चर्चेत या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला.आंध्र प्रदेशचे राज्य निवडणूक अधिकारी म्हणून नीलम सावने यांनी कार्यभार स्वीकारल्यावर त्याच दिवशी अधिसूचना काढून निवडणुकीची घोषणा केली.नायडू म्हणाले, राज्य निवडणूक आयुक्त हे केवळ रबर स्टॅँप झाले आहेत.

त्यामुळे तिरुपती लोकसभा पोटनिवडणूक झाल्यावरच नव्याने अधिसूचना काढण्याची आमची मागणी आहे. राज्य निवडणूक आयुक्तांनी सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करूनच मग निवडणुकांबाबत निर्णय घ्यायला हवा. त्यामुळे निवडणुका स्वतंत्र आणि खुल्या वातावरणात होतील का याबाबत आमच्या मनात शंका आहे.

त्यामुळेच तेलगू देशम पक्षाने निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.निवडणूक आयोगाने काढलेल्या अधिसूचनेनुसार आंध्र प्रदेशात८ एप्रिलला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होणार आहेत. १० एप्रिल रोजी निकाल घोषित होतील. या निवडणुका २०२० मध्येच घेणे अपेक्षित होते. परंतु, कोरोनाच्या साथीमुळे पुढे ढकलल्या होत्या.

Telugu Desam Party boycotts Zilla Parishad-Panchayat Samiti elections, expresses doubts about open elections

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*