Media part Reports : राफेल डीलमध्ये दलालीवरून मीडिया पार्ट या फ्रेंच संकेतस्थळाने गुरुवारी म्हटले की, त्यांच्याकडे काही दस्तऐवज आहेत, ज्यावरून हे कळते की, राफेल निर्मात्या कंपनी दसॉल्ट आणि त्यांची सहायक कंपनी थाल्सने सुषेण गुप्ता (Sushen Gupta) यांना गुप्त कमिशनच्या रूपात अनेक मिलियन युरो दिले आहेत. मीडियापार्टनुसार, दसॉल्टचे 2004 ते 2013 दरम्यानचे काही आर्थिक व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आहेत. कंपनीने या काळात काही शेल कंपन्या आणि परदेशातील अकाउंटमध्ये पैसा पाठवून कमिशन दिल्याचे सांगण्यात येत आहे. मीडियापार्टने हे सर्व व्यवहार सुषेण गुप्ता यांच्याशी संबंधित काही दस्तऐवजांवरून मिळाल्याचा दावा केला आहे. यामुळे आता 2004 ते 2013 दरम्यानच्या सर्व व्यवहारांवर संशय उत्पन्न झाला आहे. Media part Reports Suggest Sushen Gupta alleged broker in the Raphael deal, had been paid Before 2014
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राफेल डीलमध्ये दलालीवरून मीडिया पार्ट या फ्रेंच संकेतस्थळाने गुरुवारी म्हटले की, त्यांच्याकडे काही दस्तऐवज आहेत, ज्यावरून हे कळते की, राफेल निर्मात्या कंपनी दसॉल्ट आणि त्यांची सहायक कंपनी थाल्सने सुषेण गुप्ता यांना गुप्त कमिशनच्या रूपात अनेक मिलियन युरो दिले आहेत.
मीडियापार्टनुसार, दसॉल्टचे 2004 ते 2013 दरम्यानचे काही आर्थिक व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आहेत. कंपनीने या काळात काही शेल कंपन्या आणि परदेशातील अकाउंटमध्ये पैसा पाठवून कमिशन दिल्याचे सांगण्यात येत आहे. मीडियापार्टने हे सर्व व्यवहार सुषेण गुप्ता यांच्याशी संबंधित काही दस्तऐवजांवरून मिळाल्याचा दावा केला आहे. यामुळे आता 2004 ते 2013 दरम्यानच्या सर्व व्यवहारांवर संशय उत्पन्न झाला आहे.
राफेल डीलवरून आपल्या तिसऱ्या आणि अखेरच्या रिपोर्टमध्ये मीडियापार्टने दावा केला आहे की, गुप्ता यांनी हा पैसा परदेशातील अकाउंट आणि शेल कंपन्यांच्या माध्यमातून पोहोचवण्यात आला होता, यासाठी सॉफ्टवेअर सल्लागार म्हणून बिलाचा वापर करण्यात आला होता.
विशेष बाब अशी की, याच सुषेण गुप्ता यांचे नाव ऑगस्ट वेस्टलँड चार्जशीटमध्येही आहे. याबाबतीत हिन्दुस्तान टाइम्सतर्फे मीडिया रिपोर्ट्सवरून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना डसाल्ट आणि थेल्सने कोणतेही उत्तर दिले नाही. दुसरीकडे, अंमलबजावणी संचालनालयानेही फ्रेंच माध्यमाच्या दाव्यावर कोणतीही टिप्पणी केली नाही. रविवार मीडियापार्ट ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात दावा करण्यात आला होता की, दसॉल्ट एव्हिएशनने या डीलमध्ये एका भारतीय मध्यस्थाला एक मिलियन युरो (9 कोटी रुपये) दलाली दिली होती.
मीडिया पार्टने दावा केलाय की, पेमेंटचा मोठा भाग 2013च्या आधीच अदा करण्यात आला होता. सुषेण गुप्ता यांच्याशी संबंधित एका स्प्रेडशीटमध्ये कंपनीचा ‘डी’ आद्याक्षराने उल्लेख आहे. डी हे अक्षर कोड स्वरूपात वापरण्यात आले असून दसॉल्टसाठी ते वापरण्यात आले आहे. या ‘डी’ने तब्बल 14.6 मिलियन युरो 2004 ते 2013 या काळात सिंगापूर स्थित इंटरडेव या कंपनीला दिल्याचा त्यात उल्लेख आहे. इंटरडेव ही शेल कंपनी असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही कंपनी गुप्ता कुटुंबाशी संबंधित एका व्यक्तीकडून चालवली जात असल्याचेही त्यात म्हटले आहे.
गुप्ता यांच्याशीच संबंधित आणखी एका स्प्रेडशीटवरून असे कळते की, 2004 ते 2008 या काळात थेल्सने तब्बल 2.4 मिलियन युरो दुसऱ्या एका शेल कंपनीला दिल्याचे दिसून येते.
दसॉल्टने मात्र सर्व दावे फेटाळून लावले असून राफेल डीलमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. दसॉल्टने म्हटले की, फ्रेंच सरकारच्या अधिकृत संस्थांद्वारे याबाबत वेगवेगळी चौकशी सुरू आहे. फ्रान्सच्या अँटी करप्शन एजन्सीकडूनही तो होत आहे. यादरम्यान कंपनीकडून कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही. उलट ही विमाननिर्मिती कंपनी कायद्यांचे कठोरपणे पालन करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
In #UPA’s aborted #Rafale deal, kickbacks were paid to middleman #SuhenGupta, as per this report👇, during 2004-13. Where there is a defence deal, the “Hand” will be there, stretched out. No kickbacks btw, report says, after 2014. Which chowkidar was a chor, @RahulGandhi? pic.twitter.com/LPX1LUAlMA — Minhaz Merchant (@MinhazMerchant) April 9, 2021
In #UPA’s aborted #Rafale deal, kickbacks were paid to middleman #SuhenGupta, as per this report👇, during 2004-13. Where there is a defence deal, the “Hand” will be there, stretched out. No kickbacks btw, report says, after 2014. Which chowkidar was a chor, @RahulGandhi? pic.twitter.com/LPX1LUAlMA
— Minhaz Merchant (@MinhazMerchant) April 9, 2021
यामुद्द्यावर ज्येष्ठ पत्रकार,विचारवंत मिन्हाज मर्चंट यांनी एचटीचे कात्रण शेअर करून काँग्रेसला चिमटा काढला आहे. ट्वीट करून ते म्हणाले की, यूपीएच्या काळात रद्द झालेल्या राफेल डीलमध्ये दलाल सुषेण गुप्ताचा मात्र लाभ झालाय. या रिपोर्टनुसार, 2004 ते 2013 दरम्यान प्रत्येक संरक्षण करारा एक ‘हात’ दिसून येतो. उलट 2014 नंतर असा कुणीही मध्यस्थ नव्हता. मग राहुल गांधीजी सांगा, कोणता चौकीदार चोर होता?
Media part Reports Suggest Sushen Gupta alleged broker in the Raphael deal, had been paid Before 2014
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App