मायावतींनी राहूल गांधींना फटकारले, दुसऱ्या पक्षावर बोलण्यापेक्षा स्वत;च्या पक्षाची चिंता करा

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांनी कांँग्रेस खासदार राहुल गांधी यांना चांगलेच फटकारले आहे. दुसऱ्या पक्षावर बोलण्यापेक्षा आपल्या पक्षाची चिंता करायला हवी असे त्यांनी म्हटले आहे.उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मायावती यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट राहूल गांधी यांनी केला होता.Mayawati slaps Rahul Gandhi, worry about your own party rather than talking about the other party

राहूल गांधी यांच्या या वक्तव्यास नाकारात मायावती यांनी म्हटले आहे की, काँग्रेस कधीच दलितांच्या बाजूने उभी राहिली नाही. राहुल गांधी यांनी बसपाच्या विरोधात बोलण्याआधी 100 वेळा विचार करायला हवा. त्यांचे हे वक्तव्य ते जातीवादी विचाराचे आहेत, असे दर्शवते. काँग्रेसने दुसऱ्या पक्षांपेक्षा आपल्या पक्षाची चिंता करायला हवी. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसची परिस्थिती ही मांजर ओरबाडल्यासारखी झाली आहे.



काँग्रेस पक्षाने बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना उत्तर प्रदेशमध्ये युती करण्याची आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनण्याची ऑफर दिली होती. मात्र, त्या बोलल्याही नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला होता. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि पेगासस यांच्याकडून निर्माण होत असलेल्या दबावामुळे मायावती दलितांच्या आवाजासाठी लढत नाही आहेत आणि त्यांनी भाजपला मार्ग मोकळा करुन दिला आहे, असेही त्यांनी म्हटले होते.

यावर उत्तर देताना पत्रकार परिषदेत मायावती म्हणाल्या की, मला हे माहित झाले आहे की राहुल गांधी यांनी पक्ष आणि पक्षाचे प्रमुख यांच्यावर जी टीका केली आहे त्यावरुन ते जातीवादी मानसिकतेचे आहे हे दर्शवते. काँग्रेसने कधीच दलितांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीला उंचावण्यासाठी काहीही केलेले नाही. दलितांना आरक्षाचाही पूर्ण लाभ दिला नाही. हे लोक आपल्या विखुरलेल्या घराला सांभाळू शकत नाही आहे.

राजीव गांधी सुद्धा कांशीराम जी यांना सीआयए एजंट म्हणाले होते. ते म्हणतात की, बसपा प्रमुख सीबीआय, ईडीला घाबरते. मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती, हे राहुल गांधी जे म्हणत आहेत ते खोटे आहे. भाजपविरुद्ध लढण्याची काँग्रेसची वृत्ती उदासीन आहे. भाजप आणि कंपनीच्या लोकांना ‘साम दाम दंड भेड’ करत विरोधी पक्ष नसलेले सरकार चालवायचे आहे.

2007मध्ये जेव्हा बसपाचे पूर्ण बहुमताचे सरकार होते, तेव्हा केंद्रात कांग्रेसचे सरकार होते. अयोध्या प्रकरणात राज्यातील परिस्थितीत बिघडायला हवी, यासाठी केंद्राने आम्हाला सुरक्षा दलपण दिले नव्हते. राज्यातील परिस्थिती खराब करुन राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावे, अशी काँग्रेसची इच्छा होती.

Mayawati slaps Rahul Gandhi, worry about your own party rather than talking about the other party

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात