मायावतींची तडकाफडकी चाल; आकाश आनंदला उत्तराधिकारी आणि समन्वयक पदावरून हटविले!!

Mayawati removes nephew Akash Anand as BSP national coordinator and her 'successor'

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आपले बंधू आनंद कुमार यांचे चिरंजीव आकाश आनंद यांना अचानक उत्तराधिकारी आणि पक्षाचा समन्वय या पदावरून हटवून बाजूला केले. आकाश आनंद यांना पुरेशी राजकीय प्रगल्भता येत नाही तोपर्यंत बहुजन समाज पक्षातील नेतृत्वाचा उत्तराधिकारी आणि पक्ष समन्वयक या दोन पदावरून त्यांना हटविले असल्याची घोषणा मायावती यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून केली. Mayawati removes nephew Akash Anand as BSP national coordinator and her ‘successor’

भारतातल्या कोणत्याही बड्या नेत्याने अशा प्रकारे आपणच नेमलेल्या राजकीय उत्तराधिकाऱ्याला स्वतःहून राजकीय प्रगल्भतेच्या मुद्द्यावर बाजूला करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोणत्याही घराणेशाही पक्षात सर्वसाधारणपणे भारतात बंड होते. आई, वडील, भाऊ, बहीण यांच्यामध्ये राजकीय मतभेद झाल्यानंतर राजकीय पक्षांना अनेक फाटे फुटतात. त्या फाट्यांचे प्रमुख स्वतःचा पक्षच “ओरिजिनल” असल्याचे सांगतात. या पार्श्वभूमीवर मायावती यांच्यासारख्या बड्या नेतृत्वाने स्वतःच काही महिन्यांपूर्वी नेमलेल्या आकाश आनंद यांच्यासारख्या उत्तराधिकाऱ्याला राजकीय प्रगल्भता येईपर्यंत बाजूला करणे ही घटना भारतीय राजकारणात फारच वेगळी ठरली आहे.

मायावती यांनी डिसेंबर 2023 मध्येच आकाश आनंद यांची बहुजन समाज पक्षात आपल्या नेतृत्वाचा उत्तराधिकारी आणि पक्षाचा समन्वयक म्हणून नेमणूक केली होती. मायावती यांच्या खालोखाल पक्षात स्टार प्रचारक म्हणून त्यांचे स्थान होते. मायावती यांनी त्यांना उत्तराधिकारी आणि पक्षाचा समन्वयक म्हणून बाजूला केल्यानंतरही आकाश आनंद यांचे पक्ष कार्य सुरूच राहणार असून ते पक्षाचे एक प्रचारक म्हणून काम करतच राहतील. त्याचबरोबर मायावती यांचे धाकटे बंधू आणि आकाश आनंद यांचे वडील आनंद कुमार हे देखील पहिल्यासारखेच बहुजन समाज पक्षाचे काम करत राहतील, असे मायावतींनी जाहीर केले आहे.

मायावतींनी तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयाचे अनेक अर्थ लावले जात आहेत. आकाश आनंद यांनी मध्यंतरी सीतापूर मध्ये भाजप विरोधात टीका करताना आक्षेपार्ह उद्गार काढले होते. त्यांनी काही मुलाखती देऊन स्वतःची प्रतिमा निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याच वेळी पक्षात समन्वय राखण्यात ते मायावतींच्या अपेक्षेनुसार यशस्वी ठरत नव्हते. त्याचबरोबर बहुजन समाज पक्षाला सगळीकडून अपयश येत असताना आकाश आनंद यांना उत्तर अधिकारी म्हणून लाँच करणे यातून त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच अपयशाचा ठपका ठेवण्यासारखे झाले असते. त्यामुळे मायावतींनी त्यांना उत्तराधिकारी आणि पक्ष समन्वयक म्हणून बाजूला केले, असा तर्क लावला जात आहे.

Mayawati removes nephew Akash Anand as BSP national coordinator and her ‘successor’

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात