आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक-2024 च्या तयारीसाठी भारत निवडणूक आयोग जोमाने कामाला लागला आहे. यावेळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी क्रिकेटचा देव, भारतरत्न पुरस्कार विजेता सचिन तेंडुलकर याची निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून निवड केली आहे. Master blaster Sachin Tendulkars new innings Election Commission made National Icon to encourage voters
यावेळी लोकसभा निवडणुकीत सचिन तेंडुलकर निवडणूक आयोगाच्या (ECI) खेळपट्टीवर फलंदाजी करणार आहे. सचिन तेंडुलकर ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून ECI सोबत नवीन इनिंगची सुरुवात करेल. यासंदर्भात बुधवारी आकाशवाणीच्या रंगभवन येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, ECI ने गेल्या वर्षी प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांची नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली होती. यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रसिद्ध क्रिकेटपटू माजी कर्णधार एम.एस. धोनी, चित्रपट अभिनेता आमिर खान आणि बॉक्सर मेरी कोम सारख्या दिग्गजांना देखील ECI ने राष्ट्रीय आयकॉन म्हणून निवडले आहे.
सचिन तेंडुलकर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृती आणि शिक्षणासाठी लोकांना प्रोत्साहित करणार असून ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. उद्या, 23 ऑगस्ट रोजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे आणि अरुण गोयल यांच्या उपस्थितीत रंग भवन, ऑल इंडिया रेडिओ, नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत ३ वर्षांच्या कालावधीसाठी सामंजस्य करार केला जाणार आहे. विशेषत: तरुण मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे केले जात आहे जे त्यांच्यावर अनोखा प्रभाव टाकत आहेत. आगामी निवडणुकांमध्ये, विशेषत: लोकसभा निवडणूक-2024 साठी मतदारांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी हे केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App