वृक्षसंवर्धनाचे महत्व गाण्याच्या माध्यमातून सांगितले गेले.
विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : भाजपा राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम पार पडले. नागरिकांनी उत्साहाने वृक्षारोपण करून उपक्रमाचे कौतुक केले. पर्यावरण मित्र,निवृत्त वन अधिकारी मनोहर महाडिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी शास्त्री नगर येथील मनपा शाळेतील मुख्याध्यापिका तसेच इतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. Plantation of trees at various places in Chhatrapati Sambhajinagar on the occasion of Vijayatai Rahatkars birthday
भाजपा राष्ट्रीय सचिव आणि ‘आनंदी एम्पॉवर फाउंडेशन’च्या अध्यक्षा, संस्थापक विजयाताई रहाटकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, २१ ऑगस्ट रोजी दिवसभर विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हे सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडले.
आनंदी एम्पॉवर फाउंडेशन मधील विभावरी भालेराव, मिताली धुमाळ, सचिन गुगळे, आशिष राठोड, भाग्यश्री गोजरेकर आदींसह विद्यार्थिनींचा मोठ्या संख्येने सहभाग होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे महाडिक यांनी सर्वांना झाडे जगवा झाडे वाचवा व वृक्षसंवर्धनाचे महत्व गाण्याच्या माध्यमातून सांगितले. तसेच अतिशय सुंदर कवितेच्या माध्यमातून विजयाताईना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App