तरुणी आणि महिला वर्गाकडून मोठ्याप्रमाणात प्रतिसाद; यशस्वी विद्यार्थांना प्रमाणपत्रही वाटप
विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : भाजपा राष्ट्रीय सचिव आणि ‘आनंदी एम्पॉवर फाउंडेशन’च्या अध्यक्षा, संस्थापक विजयाताई रहाटकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, २१ ऑगस्ट रोजी दिवसभर विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हे सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडले. Launch of free courses on the occasion of BJP National Secretary Vijayatai Rahatkars birthday
विजयाताई रहाटकर यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे पाच मोफत कोर्सचा भव्य शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास मिस इंडिया उपविजेत्या, मिस महाराष्ट्र आणि चार्टर्ड अकाउंटंट्स शेरॉन रॉड्रिजस प्रमुख पाहुण्या होत्या. या मोफत कोर्समध्ये वेबडिझाइनिंग, ग्राफिक डिझाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, स्पोकन इंग्लिश, ब्यूटीपार्लर यांचा समावेश आहे. तरुणी तसेच महिला वर्गाकडून या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या वेळी आनंदी एम्पॉवर फाऊंडेशन मधील python programming आणि basic ब्युटी पार्लर कोर्स यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनींना प्रमुख पाहुणे शेरॉन रोड्रिगस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच आनंदी एम्पॉवर फाउंडेशन तर्फे 9 जुलाई 2023 रोजी भव्य जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले होते, त्या माध्यमातून ज्या विद्यार्थिनींना नौकरी मिळालेली आहे. अशा विद्यार्थिनींचा सत्कार देखील करण्यात आला.
कार्यक्रमा प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुण्या शेरॉन म्हणाल्या, ’’यशाचे उंच उंच शिखरे चढत असताना आपण आपल्याला मदत करत असलेल्या संस्था तसेच व्यक्तिंप्रती आदर बाळगला पाहिजे. याचबरोबर आत्मविश्वास आणि त्यांच्या यशाचे रहस्यही त्यांनी यावेळी सांगितले.
विजयाताई रहाटकर यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या या संस्थेने महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता आणि भविष्यात संस्थेशी जोडून राहण्याचा विश्वास देऊन सर्व महिलांनी विजयाताईंना वाढदिवसाच्या आणि दीर्घ आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more