…तर वैवाहिक बलात्कार हा गुन्हा मानता येणार नाही – अलाहाबाद उच्च न्यायालय

या निर्णयासह न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे


विशेष प्रतिनिधी

अलाहाबाद : पत्नीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असल्यास वैवाहिक बलात्कार हा भारतीय दंड संहितेनुसार (आयपीसी) गुन्हा मानला जाऊ शकत नाही, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पत्नीविरुद्ध ‘अनैसर्गिक गुन्हा’ केल्याप्रकरणी पतीला निर्दोष ठरवताना न्यायालयाने ही टिप्पणी केली.Marital rape cannot be considered a crime if the wife is 18 years of age or older Allahabad High Court



या निर्णयासह न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. पत्नीवर ‘अनैसर्गिक गुन्हा’ केल्याप्रकरणी पतीला निर्दोष ठरवताना न्यायालयाने ही टिप्पणी केली. या प्रकरणातील आरोपींना आयपीसीच्या कलम ३७७ अंतर्गत दोषी ठरवता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

तर न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा यांच्या खंडपीठाने सांगितले की, या देशात वैवाहिक बलात्कार हा अद्याप गुन्हा मानला जात नाही. उच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की, वैवाहिक बलात्काराचा गुन्हा ठरवणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टात अद्याप प्रलंबित आहेत आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाचा खटल्याचा निकाल आलेला नाही. त्यामुळे सध्याच्या संदर्भात पत्नीचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असेल, तर वैवाहिक बलात्कारासाठी कोणतीही शिक्षा नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत यात बदल करता येणार नाही.

या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयानेही मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या विधानाचे समर्थन केले आहे. त्यानुसार, ‘वैवाहिक जीवनात अनैसर्गिक गुन्ह्यांना स्थान नाही. आयपीसीच्या कलम ३७७ अंतर्गत ही टिप्पणी करण्यात आली आहे.

Marital rape cannot be considered a crime if the wife is 18 years of age or older Allahabad High Court

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात