विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावर वाद पेटलाय मराठा विरुद्ध ओबीसी, पण जितेंद्र आव्हाडांनी दाखवलीय महाराष्ट्राचा “मणिपूर” होण्याची भीती!!, असे आज घडले आहे. Controversy Maratha vs OBC jintendra awhad
मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातल्या वैयक्तिक भांडणात परावर्तित झाला आहे. त्यात कालच मराठा आंदोलकांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूरात चप्पल फेकून वादाचा मोठा भडका उडवला आहे आणि त्यात आता जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्राचा “मणिपूर” करण्याची भाषा वापरून त्या भडक्यात तेल ओतले आहे.
वादाच्या भडक्यात तेल ओतण्यासाठी जितेंद्र आव्हाडांना कालच्या छगन भुजबळांच्या भाषणाचे निमित्त मिळाले. छगन भुजबळ यांनी इंदापूर मधल्या ओबीसी महामेळाव्यातल्या भाषणात मनोज जरांगेंच्या हिंदी बोलण्याचे मिमिक्री केली. काय को हमारे गाव में आता है??, हमारे गाव में आने काच नही. हमारे जखम पर मीठ चोळता है क्या??, असे जरांगे यांच्या भाषणाचे रेकॉर्डिंग छगन भुजबळ यांनी काल इंदापूरच्या सभेत माईक वरून ऐकवले आणि नंतर ते वाचूनही दाखवले जरांगेंचे हिंदी कच्चे असल्याची खिल्ली भुजबळांनी उडवली.
या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राचा “मणिपूर” होण्याची भाषा वापरली. महाराष्ट्रात आरक्षणाचा विषय गंभीर आहे. त्याकडे सर्वांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे विशेषतः मंत्र्यांनी हे गांभीर्य अधिक दाखवले पाहिजे. मराठा – ओबीसी वादात दोन्हीकडच्या बाजूने जबाबदारीने वागणे अपेक्षित असताना छगन भुजबळ सारखे मंत्री जर जरांगे पाटलांची मिमिक्री करून केलेली उडवणार असतील, तर ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला अशोभनीय आहेच, पण मराठा ओबीसी वादाच्या आगीत तेल ओतत आहेत. महाराष्ट्राचा जातीय सलोखा टिकवण्यासाठी प्रलोभनांपासून दूर राहावे अन्यथा महाराष्ट्राचा “मणिपूर” व्हायला वेळ लागणार नाही, अशी भीती जितेंद्र आव्हाड यांनी दाखवली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more