या निर्णयाचे राजकीय नेतेमंडळींसह, साहित्य, कला अशा सर्वच क्षेत्रातून स्वागत होत आहे. Modi government
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला मोठी भेट दिली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून ही मागणी केली जात होती. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने आज सर्वात मोठा निर्णय जाहीर केला असल्याचं बोललं जात आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयाचे राजकीय नेतेमंडळींसह, साहित्य, कला अशा सर्वच क्षेत्रातून स्वागत होत आहे. शिवाय प्रत्येक मराठी माणूस या निर्णयामुळे आनंदला आहे. केवळ महाराष्ट्रतीलच नाही तर जगभरातील मराठी बांधवांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेसह पाली, बंगाली, आसामी, प्राकृत भाषेला अभिजात दर्जा बहाल केला आहे.
Congress leaders : सुशीलकुमारांनी काँग्रेसला सावरकरांबाबत “सुधारायला” सांगितले; पण कर्नाटकच्या मंत्र्याने सावरकरांवर गोमांस खाल्याचे गरळ ओकले!!
अनेक वर्षांपासून सगळ्याच राजकीय पक्षांची तसेच मराठी एकीकरण समिती असणाऱ्या सगळ्यांची मागणी होती की, मायबोली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला जावा. त्यानंतर केंद्र सरकारने हा सर्वात मोठा निर्णय़ जाहीर केला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वच राजकीय पक्षांसह मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी लढत असणाऱ्या सर्वच संघटनांना आनंदाची बातमी मिळाली आहे.
Marathi has been given the status of classical language by the Modi government
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App