२०१४ नंतर भारत बनला अमेरिकेचा गुलाम – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर यांचा हल्लाबोल


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. गेल्या सात वर्षांपासून भारत अमेरिकेचा गुलाम बनला आहे. अलिप्ततावादी धोरणाची तर कोठेच चर्चा होत नाही, शांततेबाबतही बोलले जात नाही, अशा शब्दांत अय्यर यांनी मत मांडले आहे. Manishnakar Ayar targets Govt

भारत आणि रशिया यांच्या संबंधाबाबत आयोजित परिसंवादात बोलताना मणिशंकर अय्यर यांनी मोदी सरकारच्या अमेरिकी धोरणावर टीका केली. ते म्हणाले की, गेल्या सात वर्षांपासून अलिप्ततावादी धोरणावर चर्चा केली जात नाही. शांततेबाबतही कोणी बोलत नाही. आपण अमेरिकेचे गुलाम होऊन बसलो आहोत. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण चीनपासून बचावात्मक धोरण आखत आहोत. याउलट चीनचे सर्वात जवळचे मित्र तुम्हीच आहात, असेही अय्यर म्हणाले.



यावेळी अय्यर यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात दृढ होणाऱ्या संबंधाबाबत काही प्रश्न उपस्थित केले. अय्यर यांच्या मते, भारत आणि रशिया यांचे संबंध जुने असून रशियाने भारताला नेहमीच मदत केली आहे. परंतु मोदी सत्तेत आल्यानंतर हे संबंध दुरावले गेले. २०१४ पर्यंत रशियाबरोबरचे संबंध आणि व्यापार हा चांगला होता. परंतु सात वर्षात हे संबंध बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे.

Manishnakar Ayar targets Govt

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात