यापूर्वी मंडईतील बेकायदा मशीद सील करणार असल्याचे मंडी प्रशासनाने जाहीर केले होते Mandi Himachal Pradesh
विशेष प्रतिनिधी
मंडी: हिमाचल प्रदेशातील मंडी शहरात बेकायदेशीरपणे जमिनीवर कब्जा करून बांधलेली मशीद पाडण्याची मागणी करणाऱ्या मोठ्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांच्या न्यायालयाने मोठा आदेश दिला आहे. मशिदीचे दोन बेकायदेशीर मजले पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त एच.एस.राणा यांच्या न्यायालयाने यासाठी एक महिन्याची (३० दिवस) मुदत दिली आहे. यापूर्वी मंडईतील बेकायदा मशीद सील करणार असल्याचे मंडी प्रशासनाने जाहीर केले होते, मात्र आंदोलक ठाम आहेत. Mandi Himachal Pradesh
मंडी महापालिकेचे आयुक्त एच.एस.राणा यांनी सांगितले की, आम्ही तीन महिन्यांत या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली आहे. या बांधकामाची मंजुरी घेतली नसल्यामुळे मशिदीमध्ये बेकायदा बांधकाम करण्यात आल्याचे सुनावणीदरम्यान आढळून आले. नकाशा पास केला नाही. त्यामुळे ३० दिवसांत बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत.
मशीद पुन्हा जुन्या स्वरुपात आणावी लागेल, जर मशीद समितीनेच बेकायदा बांधकाम पाडले नाही तर महापालिका ते पाडेल. मशीद समिती ३० दिवसांच्या आत उच्च न्यायालयात अपील करू शकते.
Bhagyashree Atram : अजित पवार यांनी मला ज्ञान शिकवू नये, भाग्यश्री आत्राम यांनी थेटच सुनावले
मंडी शहरातील जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करून बांधलेली मशीद पाडण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या हिंदू संघटनांशी संबंधित लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी पाण्याच्या तोफांचा वापर केला. आंदोलकांनी प्रथम मंडी बाजार परिसरात मोर्चा काढला आणि नंतर सेरी मंच येथे धरणे धरले. त्यानंतर त्यांनी मशिदीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वॉटर कॅननचा वापर केला. हिंदू संघटनांच्या निषेध मोर्चाच्या आवाहनानंतर पोलिसांनी बाजारपेठेत मोठा बंदोबस्त तैनात करून बंदोबस्त वाढवला आहे. Mandi Himachal Pradesh
काही हिंदू संघटनांचा असाही आरोप आहे की शतकानुशतके या मशिदीच्या जागेवर एक मंदिर होते, जे राजाने आपल्या एका मुस्लिम विणकराला नमाज पठणासाठी दिले होते. या मशिदीखाली उत्खनन करून पुरातत्व विभागाने मशिदीखाली मंदिर आहे का, याची तपासणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. मात्र, हिंदू संघटनांच्या या दाव्याचा कोणताही ठोस पुरावा अद्याप समोर आलेला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App