वृत्तसंस्था
कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. केंद्राने घाटल बृहत आराखडा प्रकल्पाला उशीर लावल्यानेच राज्यात पूरस्थिती ओढवली, अशी टीका त्यांनी केली. Mammata Banarjee targets Modi govt. for flood situation
मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. मोयरापूकुरमध्ये हेलिकॉप्टरने आल्यानंतर त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. गेल्या आठवड्यात पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक जिल्हे जलमय झाले. पुरात किमान २३ जणांचा मृत्यू झाला.
या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी दिल्लीला पथक पाठविण्याची घोषणाही त्यांनी केली. त्या म्हणाल्या, की हा पूर मानवनिर्मित आहे. केंद्र घाटल बृहत आराखड्याच्या अंमलबजावणीच्या आमच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत आहे. वारंवार विनंती करूनही केंद्र बधीर झाले आहे. मी पूरग्रस्त भागाचा दौरा केला असून याबाबत अहवाल तयार करेन. घाटल बृहत आराखड्याप्रमाणे या परिसरातील नद्यांमधील गाळ काढण्यासाठी तसेच कालव्यांच्या दुरुस्तीसाठी अनेक प्रकल्प हाती घेतले जातील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App