ममतांनी घेतली पीएम मोदींची भेट : पत्र देऊन मनरेगा, पीएम आवास आणि रस्ते योजनेसाठी निधीची मागणी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चार दिवसांच्या दौऱ्यावर दिल्लीत पोहोचल्या आहेत. दीदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील जीएसटी थकबाकीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यापूर्वी, ममता यांनी गेल्या वर्षी 24 नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांची भेट घेतली होती.Mamata meets PM Modi Demands funds for MGNREGA, PM Awas and Road Scheme by writing a letter

ममतांची ही भेट अशा वेळी झाली आहे जेव्हा अंमलबजावणी संचालनालय (ईडी) त्यांच्या पक्षाचे नेते पार्थ चॅटर्जी यांच्यावर कारवाई करत आहे.निधी वाटपासाठी पंतप्रधान मोदींना पत्र सुपूर्द

ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र सुपूर्द केले आहे. त्यात त्यांनी मनरेगा, पंतप्रधान आवास योजना आणि पंतप्रधान ग्रामीण सडक योजना राबविण्यासाठी राज्याला निधी देण्याचे आवाहन केले आहे. पत्रात त्यांनी लिहिले की, या योजनांबाबत केंद्राच्या वतीने 17,996 कोटी रुपये प्रलंबित आहेत.

ममता यांनी पत्रात असेही लिहिले आहे की, विकास आणि लोककल्याणाशी संबंधित अनेक योजनांवर सरकारकडून सुमारे 1,00,968.44 कोटी रुपये देणे बाकी आहे. एवढी मोठी रक्कम रखडल्याने राज्यातील कामे पूर्ण करणे आणि लोकांसाठी सोयीसुविधा निर्माण करणे कठीण होत आहे.

नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार

बंगालच्या मुख्यमंत्री 7 ऑगस्ट रोजी राजधानीत होणाऱ्या नीती आयोगाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यासोबतच त्या विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेणार आहेत. आज रात्री ममता टीएमसीचे राज्यसभा सदस्य सुखेंदू शेखर रॉय यांच्या निवासस्थानी पक्षाच्या खासदारांना भेटू शकतात. शनिवारी त्या बिगरकाँग्रेस विरोधी नेत्यांशी राजकीय मुद्द्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे.

उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी ममता यांचा दौरा महत्त्वाचा

देशात 6 ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमुळे ममता यांचा हा दौरा विशेष मानला जात आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच त्यांनी संसदेच्या प्रत्येक अधिवेशनात दिल्लीत येण्याची घोषणाही केली होती. ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचे मनोबल वाढणार आहे.

भाजप सरकारविरोधात पक्षाचे खासदार सातत्याने आंदोलने करत आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी एकजुटीत फूट पडली असतानाही ममता बॅनर्जींची ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे. यापूर्वी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्येही तणाव निर्माण झाला होता.

Mamata meets PM Modi Demands funds for MGNREGA, PM Awas and Road Scheme by writing a letter

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात