गृहमंत्री अमित शाहांची बालूरघाट येथून टीका
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : बलुरघाट येथील सभेत अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. बंगालमधील घुसखोरी बॅनर्जी कधीही थांबवू शकत नाहीत, हे फक्त भाजपच करू शकते, असे ते म्हणाले. Mamata cannot stop infiltration in Bengal only BJP can Amit Shahs comment
अमित शाह पुढे म्हणाले, ‘ममता दीदी, तुम्ही एक महिला मुख्यमंत्री आहात, तरीही संदेशखळीसारख्या लज्जास्पद घटनेवर राजकारण करत आहात. वर्षानुवर्षे तुमच्या नाकाखाली अत्याचार होत होते आणि जेव्हा ईडी टीएमसीच्या गुंडांना पकडायला गेली तेव्हा त्यांच्यावर दगडफेक झाली. तुष्टीकरण करून काही मते मिळवण्यासाठी संदेशखळीच्या गुन्हेगारांना वाचवत आहात.
याशिवाय त्यांनी म्हटले की, ‘आम्ही सीएए कायदा केला आहे. ममता दीदी बंगालच्या जनतेची दिशाभूल करत आहेत. अर्ज केल्यास तुमचे नागरिकत्व गमवावे लागेल, असे ते सांगत आहेत. मी आज तुम्हाला हे सांगण्यासाठी आलो आहे की सर्व निर्वासितांनी कोणतीही भीती न बाळगता अर्ज भरा आणि सर्वांना नागरिकत्व दिले जाईल. ममता दीदी, तुम्ही कितीही विरोध केलात तरी आम्ही सर्व निर्वासितांना नागरिकत्व देऊ. हे आमचे वचन आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App