विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माध्यमांवर दडपशाही सुरू केली आहे. सरकारी जाहिरात पाहिजे असल्यास सरकारबद्दल सकारात्मक बातम्या द्या. तुमच्या बातम्या जिल्हाधिकारी आणि पोलीसांना पाठवा. ते बातमी सकारात्मक आहे किंवा नाही याचा निर्णय घेतली असे म्हटले आहे.Mamata Banerjee orders repression of media, positive news about government if required
ममता बॅनर्जी यांचा याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका पत्रकाराला जाहिरातीच्या बदल्यात सकारात्मक बातम्या देण्यास सांगताना त्या दिसत आहेत. शुक्ला गांगुली नावाच्या एका स्थानिक पत्रकाराने ममता बॅनर्जी यांच्याकडे सरकारी जाहिराती मिळत नसल्याने संस्थेची आर्थिक स्थिती खालावल्याची कैफियत मांडली.
आम्ही अकरा वर्षांपासून पेपर चालवित आहोत. मात्र, आम्हाला आणि आमच्यासारख्या अनेक छोट्या संस्थांना जाहिराती मिळत नाहीत, असे त्या म्हणाल्या.शुक्ला गांगुली यांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर, ममता बॅनर्जी म्हणाल्या, जी वृत्तपत्रे सरकारच्य चांगल्या कामावर प्रकाश टाकतील त्यांनाच जाहिराती मिळतील.
त्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. सरकार प्रसिध्दीसाठी नेहमीच सरकारी यंत्रणा वापरत नाही. वृत्तपत्रांनी ते काम करावे. आम्ही राज्याच्या विकासासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. मोठमोठे टीव्ही चॅनेल्स फक्त एकदाच बातम्या दाखवतील. तथापि, वृत्तपत्रे याबद्दल तपशीलवार लिहितील आणि राज्यातील प्रत्येक गावात माहिती पोहोचेल याची खात्री करतील.
त्यामुळे सकारात्मकतेने हे काम करणाऱ्या वृत्तपत्रांची आम्ही काळजी घेऊ. तुमच्या पेपरची एक पत्र जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातही पाठवा. ते बातम्या सकारात्मक आहेत की नकारात्मक आहेत, याचा आढावा घेतली. जे सकारात्मक बातम्या देतील त्यांनाच जाहिरातील देतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App