विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर येथील उमेदवारीवर भाजपच्या उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांनी आक्षेप घेतला आहे.Mamata Banerjee hides information about crimes, BJP’s Priyanka Tibrewal demands cancellation of candidature
बॅनर्जी यांनी उमेदवारी अर्जामध्ये त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा आरोप प्रियंका टिबरेवाल यांनी केला असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. हे सर्व गुन्हे २०१८ मध्ये आसाममध्ये दाखल झाले आहेत. त्याबाबत माहिती तक्रारीमध्ये देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने भवानीपूर मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर केली असून हा ममतांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यांच्याविरोधात भाजपने प्रियंका टिबरेवाल यांना उमेदवारी दिली आहे. टिबरेवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांचे निवडणूक एजंट सजल घोष यांनी लेखी तक्रार दाखल केली.
घोष यांनी म्हटले आहे, की ममता बॅनर्जी यांनी त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या पाच गुन्ह्यांची माहिती ल्पविली आहे. उमेदवारी अर्जसोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात या गुन्ह्यांचा उल्लेख केलेला नाही.
भवानीपूर मतदारसंघात ३० सप्टेंबरला मतदान होणार असून ३ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम येथे भाजपचे शुभेंदू अधिकारी यांनी पराभव केला होता. मात्र, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना सहा महिन्यांमध्ये विधिमंडळात निवडून जाणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App