ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे समाजवादी पार्टी मात्र खूश झाल्याचे दिसत आहे Mamata Banerjee has demanded that the post of Lok Sabha Vice President should be given to the Samajwadi Party
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर नव्या सरकारच्या मंत्र्यांनी शपथ घेतली. यासोबतच भारतीय जनता पक्षाचे कोटा येथील खासदार ओम बिर्ला यांना पुन्हा एकदा 18व्या लोकसभेचे अध्यक्ष बनवण्यात आले, मात्र उपसभापतीपदाबाबत अजूनही साशंकता आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी उपसभापतीपदासाठी समाजवादी पक्षाला (एसपी) संधी देण्याची मागणी केली.
लोकसभेच्या उपसभापतीपदाची निवडणूक कधी होणार हे स्पष्ट झाले नसले, तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचे फैजाबादचे खासदार अवधेश प्रसाद यांचे नाव वरिष्ठ नेत्यांना सुचवले होते. मात्र, याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रस्तावावर समाजवादी पक्ष खूश असून काँग्रेसनेही नकार दिला नसल्याचे मानले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने यापूर्वी के सुरेश यांना स्पीकरनंतर उपसभापतीपदाचे उमेदवार बनवण्याचे संकेत दिले होते, परंतु ममतांच्या प्रस्तावाने त्यांचे मनसूबे धुळीस मिळाल्याचे दिसत आहे. उपसभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने आपल्या मित्रपक्षाला संधी द्यावी, असे टीएमसीचे मत आहे. काँग्रेसचे खासदार के सुरेश यांच्याप्रमाणेच फैजाबादचे सपा खासदार अवधेश प्रसाद हे देखील दलित समाजातून आले आहेत आणि राम मंदिराच्या उभारणीनंतर त्यांनी अयोध्येतून निवडणूक जिंकणे हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
परंपरेनुसार लोकसभेत उपसभापतीपद विरोधकांकडे जाते. सभापती निवडीच्या वेळी विरोधकांनी उपसभापतीपदाची अट सर्वसहमतीपूर्वी ठेवली होती, मात्र हे प्रकरण मिटले नाही. अशा स्थितीत विरोधी आघाडीला उपसभापतीपद मिळेल, अशी आशा कमी आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) कोणत्याही पक्षाकडून उपसभापतीपदाचा उमेदवार दिला गेला, तर अवधेश प्रसाद हे इंडिया आघाडीकडून उमेदवार असू शकतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App