विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉँग्रेसच्य प्रमुख ममता बॅनर्जी यांना दुर्गेच्या रुपात साकारण्यास काही शिल्पकारांनी सुरूवात केली आहे. तीन दुर्गोत्सव समिती त्यासाठी एकत्र आल्या आहेत. दुर्गा पूजेपूर्वी ममतांच्या रुपात दुर्गा ते साकारत आहेत.Mamata Banerjee as Durga , started making idols in West Bengal
नजरूल पार्क उन्नती समितीचे उपाध्यक्ष पार्थ सरकार यांनी दावा केला की बंगालमधील प्रत्येक व्यक्ती ममता बॅनर्जी यांना देवी दुर्गा मानते. त्यांनी लोकांना खूप मदत केली आहे. त्यामुळे त्यांची दुर्गेच्या रुपात पूजा केली जाणार आहे.
ममता बॅनर्जी यांची एका बाजुला दुर्गेच्या रुपात पूजा करण्याची तयारी सुरू असतानाच त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मानवी अधिकारांचे उल्लंघन केल्याची प्रकरणेही उघड झाली आहेत. या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशी सुरू केली आहे.
राज्यातील विरोधकांवर सामूहिक बलात्कार आणि खून केल्याचा आरोप तृणमूल कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर होत आहे.ममानवी हक्क आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे की आत्तापर्यंत तृणमूल कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर महिलांशी संबंधित ५७ तक्रारी आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App