काँग्रेसच्या प्रचारात मल्लिकार्जुन खर्गेंचे पोस्टर नाही, दलित नेत्याशी काँग्रेसचा असा दुर्व्यवहार का??; मोदींचा बोचरा सवाल

वृत्तसंस्था

देवगढ़ (राजस्थान) : राजस्थानातल्या प्रचार सभेत काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पनौती म्हटले, पण त्या मुद्द्यावर प्रत्युत्तर देताना मोदींनी काँग्रेसलाच एक वेगळा बोचरा सवाल केला.Mallikarjun Khargen in Congress campaign, why is Congress misbehaving with Dalit leader??; Modi’s stupid question

राजस्थानामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे काँग्रेसच्या प्रचारात पोस्टर का दिसत नाही??, असा तो सवाल होता राजस्थानातील देवगढमध्ये प्रचार सभेत पंतप्रधान मोदींनी त्याच सवालाचा पुनरुच्चार केला.



पंतप्रधान मोदी म्हणाले :

मल्लिकार्जुन खर्गे एक दलित पुत्र, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. सार्वजनिक जीवनात फार दीर्घकाळ ते निवडणुका जिंकून देशसेवा करीत आहेत. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असल्यामुळे ते माझ्या विरोधातही खूप बोलत असतात, पण तरी देखील मी संपूर्ण राजस्थानात फिरल्यानंतर बघितले, जयपूर मध्ये बघितले काँग्रेसच्या प्रचारात कुठेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पोस्टर मला दिसले नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पोस्टर दिसले. त्यावर शाही परिवारातले लोक दिसले, पण मल्लिकार्जुन खर्गेंचे पोस्टर दिसले नाही. एका दलिताच्या पुत्राशी शाही खानदानाची काँग्रेस असा दुर्व्यवहार का करते??, माझ्या या प्रश्नावर काँग्रेस नेत्यांच्या तोंडाला कुलूप लागले आहे!!

पंतप्रधान मोदी शाही गांधी खानदानावर टीका करताना नेहमीच हा मुद्दा प्रखरपणे उपस्थित करतात, की देशातल्या घटनात्मक पदांवर बसलेल्या शेतकरी पुत्राचा, ओबीसी पुत्राचा किंवा अन्य कोणाही व्यक्तीचा गांधी परिवारातले का अपमान करतात??

एच. डी. देवेगौडा एक शेतकरी पुत्र. ते पंतप्रधान बनले होते, पण शाही गांधी परिवाराने त्यांची प्रतिमा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डुलक्या घेणारे पंतप्रधान म्हणून बनवली होती, असे टीकास्त्र पंतप्रधान मोदींनी लोकसभेत सोडले होते. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विषयी देखील व्यक्तिगत पातळीवर स्नेहसंबंधातून ते अनुकूल भूमिका घेतात असे दिसून आले आहे.

Mallikarjun Khargen in Congress campaign, why is Congress misbehaving with Dalit leader??; Modi’s stupid question

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात