मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसचा सोडला पंतप्रधानपदावरचा दावा, पण प्रादेशिक नेत्यांमध्ये तयार केली स्पर्धा!!


विशेष प्रतिनिधी

बेंगलोर : काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने कर्नाटकची राजधानी बंगलोर मध्ये सुरू असलेल्या विरोधकांच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसचा पंतप्रधान पदावरचा दावा सोडल्याने विशिष्ट राजकीय खळबळ निर्माण झाली आहे. खुद्द काँग्रेसमध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याचवेळी खर्गे यांनी जरी काँग्रेसचा पंतप्रधानपदावरचा दावा सोडला असला तरी गांधी परिवाराने तो खऱ्या अर्थाने सोडला आहे का??, असा सवाल तयार झाला आहे. Mallikarjun Kharge gave up Congress’s claim for the post of Prime Minister

पण त्याचबरोबर विरोधी ऐकण्यासाठी जमलेल्या प्रादेशिक नेत्यांमध्येच मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या वक्तव्यातून स्पर्धेचा साप सोडून दिला आहे.

विरोधी ऐक्यामध्ये सर्वात बलाढ्य असणाऱ्या काँग्रेसने पंतप्रधानपदाचा दावा सोडल्यानंतर सर्वसाधारणपणे तुल्यबळ असलेल्या प्रादेशिक नेत्यांमध्ये पंतप्रधान पदासाठी चढाओढ सुरू झाली आहे. यामध्ये अर्थातच सध्या संख्याबळाने तुल्यबळ असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा प्रामुख्याने समावेश आहे.


मल्लिकार्जुन खरगेंच्या पुत्राने पंतप्रधान मोदींबाबत अपशब्द वापरल्यानंतर भाजपाचेही जोरदार प्रत्युत्तर, नड्डा म्हणाले…


त्यातही ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांची पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा लपवून राहिलेली नाही. हे दोन्ही नेते अत्यंत आक्रमकपणे भाजपचा मुकाबला तर करतातच पण त्याच वेळी काँग्रेस नेत्यांना देखील बिलकुलच विचारत नाहीत. विशेषत: दिल्ली, पंजाब आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांमध्ये अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस पक्ष औषधाला देखील शिल्लक ठेवलेला नाही. विरोधी ऐक्यामध्ये पंतप्रधान पद आणि त्यावरचा काँग्रेसचा दावा हा मुख्य रोडा होता. हा मुख्य रोडा मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्यातून दूर झाला की त्यांनी त्या पदासाठी चाचणी केली?? हे ही पाहणे महत्त्वाचे आहे. कारण खर्गेंनी त्या पदावर पंतप्रधान पदावरचा दावा सोडला असला तरी राहुल गांधी प्रियांका गांधी अथवा सोनिया गांधी या नेत्यांच्या तोंडून त्याला दुजोरा आलेला नाही.

त्या पलीकडे जाऊन मूळात पंतप्रधान पदाचा विषय काढून मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रादेशिक नेत्यांमध्ये स्पर्धेचा साप सोडून दिला. कारण विरोधी ऐक्याच्या बैठकीस उपस्थित असलेल्या 26 पक्षांच्या नेत्यांपैकी प्रत्येक जण विशेषतः ज्येष्ठ नेते असलेले नितीश कुमार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, एम. के. स्टालिन हे सर्वच नेते स्वतःला पंतप्रधानपदाचे उमेदवार मानतात आणि इतरांच्या पाठिंबाकडे लक्ष ठेवून असतात. अशावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान पदावरच्या काँग्रेसचा दावा सोडणे ही काँग्रेसच्याच हायकमांडची म्हणजेच अर्थात सोनिया गांधींची दुसरी खेळी तर नाही ना??, अशीही चर्चा दबक्या आवाजात विरोधकांच्या गोटात सुरू आहे झाली आहे. कारण एकीकडे पंतप्रधान पदाचा दावा सोडायचा आणि दुसरीकडे संपूर्ण काँग्रेस पक्ष प्रादेशिक पक्षांची पॉलिटिकल स्पेस खाऊन बळकट करणे करून त्याचा “रिमोट कंट्रोल” आपल्याकडे ठेवायचा!!, असा तर काँग्रेसचा डाव नाही ना??, अशी ही शंका तिथेच हजर असणाऱ्या प्रादेशिक नेत्यांना आली आहे.

Mallikarjun Kharge gave up Congress’s claim for the post of Prime Minister

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात