वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पाकिस्तानी सीमा हैदर आणि सचिनच्या प्रेमकथेत हेरगिरीचा अँगल आला आहे. सीमा यांना सोमवारी एटीएसने ग्रेटर नोएडा येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले. सीमासोबतच एटीएसने तिची चार मुले आणि सचिनलाही ताब्यात घेतले. एटीएसने नोएडा येथील सेक्टर-94 येथील कमांड कंट्रोल रूममध्ये सीमाची सुमारे 8 तास चौकशी केली.Seema Haider in custody of UP ATS; Uncle and brother in Pakistan Army, 8 hours of interrogation; Increased home security
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटेलिजन्स ब्युरो (IB) ला माहिती मिळाली आहे की सीमा हैदरचे काका पाकिस्तानी लष्करात सुभेदार आहेत. तिचा भाऊही पाकिस्तानी लष्करात आहे. तर याआधी सीमाने आपल्या भावाविषयी सांगितले होते की, तो सैन्यात नाही, पण सैन्यात भरती होण्याच्या तयारीत आहे. त्यात किती तथ्य आहे हे पाहण्यासाठी एटीएस हे इनपुट तपासत आहे.
आयबीकडून माहिती मिळाल्यानंतर एटीएसने कारवाई केली. सीमा हैदरचा पासपोर्टही तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच तिच्या मोबाईल डिटेल्सचीही फेरतपासणी केली जात आहे. दुसरीकडे नोएडा पोलिसांनी सीमाच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. सचिनच्या कुटुंबीयांना कोणालाही भेटू दिले जात नाही. सचिनच्या कुटुंबीयांनी घराचे दरवाजे बंद केले आहेत.
पाक गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असल्याचा संशय
सीमा हैदरचे प्रकरण समोर आले तेव्हा तिचे पाकिस्तानी एजन्सी आयएसआयशी संबंध असल्याची चर्चा झाली. मात्र, नंतर तपास यंत्रणांना त्याच्याशी संबंधित कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे प्रकरण प्रेमाच्या अँगलकडे वळले होते. पण आता आयबीच्या इनपुटनंतर एजन्सींनी पुन्हा हेरगिरीच्या अँगलने तपास सुरू केला आहे.
1 उपनिरीक्षक, 2 महिला आणि एक पुरुष हवालदार तैनात
नोएडाच्या रबुपुरा गावात सीमा हैदरच्या घरी एक इन्स्पेक्टर, 2 महिला आणि एक पुरुष कॉन्स्टेबल तैनात आहे. येथे दोन शिफ्टमध्ये राहणारे पोलिस त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. बाहेरच्या व्यक्तीला त्यांना भेटू दिले जात नाहीये.
पाकिस्तानच्या एका स्थानिक संघटनेनेही दिली धमकी
यापूर्वी पाकिस्तानच्या एका स्थानिक संघटनेचा व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये ते लोक सीमाला मुलांसह पाकिस्तानात पाठवण्याची धमकी देत आहेत. ते लोक रस्त्याच्या कडेला हातात बंदूक आणि बॉम्ब घेऊन बसलेले दिसले. बंदुका दाखवत ते लोक म्हणत होते की, जर आमच्या देशातील महिलांना परत पाठवले नाही तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. तसेच त्यांनी हल्ला करण्याची धमकी दिली. यानंतर रविवारी कराचीतील एक 150 वर्षे जुने मंदिर मॉलचा मार्ग बनवण्यासाठी तोडण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more