मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांच्याविषयी प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो असे म्हणत मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. केरळमधील पलक्कड मतदारसंघातून श्रीधरनच निवडून यावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. Malayalam superstar Mohanlal supporting Sreedharan, he said that every Indian is proud of him
विशेष प्रतिनिधी
तिरुअनंतपूरम : मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांच्याविषयी प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो असे म्हणत मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. केरळमधील पलक्कड मतदारसंघातून श्रीधरनच निवडून यावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
श्रीधरन यांनीच आपल्या फेसबुक पेजवर मोहनलाल यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये आगामी निवडणुकीत केरळमध्ये कोण निवडून यावे याबाबतची अपेक्षा मोहनलाल यांनी व्यक्त केली आहे.श्रीधरन यांच्यासोबत कोलमचे संयुक्त लोकशाही आघाडीचे उमेदवार शिबू बेबी जॉन आणि डाव्या आघाडीचे पठाणपूरम येथील उमेदवार अभिनेते के. बी. गणेश कुमार हेनिवडून यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
श्रीधरन यांच्याबाबत मोहनलाल यांनी म्हटले आहे की हे असे व्यक्तीमत्व आहे की प्रत्येक भारतीयाला त्यांच्याबाबत अभिमान वाटायला हवा. ते विश्वकर्मा आहेत. वादळामुळे पामबान येथील कोसळेला पूल त्यांनी अवघ्या ४६ दिवसांत पुन्हा उभारला होता. ते दूरदर्शी असून कोकण रेल्वे ही अशक्यप्राय गोष्ट त्यांनी शक्य करून दाखविली आहे. मार्गावर अनेक बोगदे खणून त्यांनी कोकण रेल्वे प्रत्यक्षात आणली. ते राष्ट्राचे निर्माते आहेत.कोची आणि दिल्लीतील मेट्रोही त्यांनीच उभारली आहे. आपणा सर्वांना विकासाच्या मार्गावर अग्रेसर करण्यासाठी त्यांना सेवा करण्याची संधी द्यायला हवी.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App