निवडणूक तोंडावर असतानाही एक उमेदवार दुसऱ्याच्या प्रचाराचे लावतोय पोस्टर, मेट्रोमॅन ई. श्रीधरन म्हणाले- हीच खरी भाजपची संस्कृती!

Metroman e. Sreedharan Praises BJP Candidate Prashanth Sivan and BJP Kerla Party Work For Help in Comapigning

निवडणुका म्हटलं की उमेदवाराला जराशीही उसंत मिळत नाही. आपल्या मतदारसंघात पायाला भिंगरी लावूनच त्यांना फिरावे लागते. आपल्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यातच त्यांचे प्रचाराचे दिवस निघून जात असतात. कोणतीही कसर राहणार नाही, याचीच जो तो काळजी घेत असतो. सध्या पाचही राज्यांत निवडणुकांमुळे हेच वातावरण आहे. परंतु सर्वांत वेगळेपण दिसून येतेय ते केरळातील निवडणुकीचे. Metroman e. Sreedharan Praises BJP Candidate Prashanth Sivan and BJP Kerla Party Work For Help in Comapigning


विशेष प्रतिनिधी

पलक्कड : निवडणुका म्हटलं की उमेदवाराला जराशीही उसंत मिळत नाही. आपल्या मतदारसंघात पायाला भिंगरी लावूनच त्यांना फिरावे लागते. आपल्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यातच त्यांचे प्रचाराचे दिवस निघून जात असतात. कोणतीही कसर राहणार नाही, याचीच जो तो काळजी घेत असतो. सध्या पाचही राज्यांत निवडणुकांमुळे हेच वातावरण आहे. परंतु सर्वांत वेगळेपण दिसून येतेय ते केरळातील निवडणुकीचे.

केरळात भाजपने डावे आणि काँग्रेसला तगडे आव्हान उभे केले आहे. यामुळे तेथे यावेळी निश्चितच बदल होणार असल्याचे बोलले जात आहे. स्वत:च्या प्रचारात सर्वच उमेदवार गुंतलेले आहेत, परंतु यापुढे जाऊन आपल्या पक्षातील इतर उमेदवाराच्या प्रचारात मदत करण्याचीही घटना केरळात घडली आहे. भाजप उमेदवार प्रशांत सिवन यांनी आपल्या प्रचाराचे काम आटोपून आपल्याच पक्षातील ई. श्रीधरन यांना प्रचारात मदत केल्याने त्यांचे विशेष कौतुक होत आहे. केरळ विधानसभा निवडणुकांमुळे येथील प्रचार मोहिमांनीही जोर धरला आहे. भाजपतर्फे येथे मेट्रोमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या ई. श्रीधरन यांना पलक्कड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांनी आपल्या प्रचारादरम्यानचा एक फोटो नुकताच ट्वीटरवर शेअर केला आहे. त्यात त्यांनी स्वत:चा प्रचार सांभाळून आपल्या प्रचारात मदत करणाऱ्या भाजप उमेदवार प्रशांत सिवन यांचे कौतुक केले आहे.

प्रशांत सिवन हे अलाथूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. आपल्या मतदारसंघातील प्रचाराचे काम आटोपल्यावर प्रशांत सिवन यांनी मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांच्या प्रचारासाठी त्यांचे पोस्टर लावून मदत केली. त्यावेळचे फोटो स्वत: श्रीधरन यांनी शेअर करत हीच खरी भाजपची संस्कृती असल्याचे म्हटले आहे. यासोबत श्रीधरण यांनी केरळ भाजपमधील कार्यकर्त्यांच्या नि:स्वार्थी भावनेला, कठोर मेहनतीला प्रणामही केला आहे.

Metroman e. Sreedharan Praises BJP Candidate Prashanth Sivan and BJP Kerla Party Work For Help in Comapigning

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती