अफगाणिस्तानमध्ये मोठी विमान दुर्घटना; प्रवासी विमान कोसळले, भारताकडून आली ‘ही’ प्रतिक्रिया!


हे विमान बदख्शानमधील झेबाक जिल्ह्यातील डोंगराळ भागात कोसळले.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: अफगाणिस्तानमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. अफगाण मीडियाच्या म्हणण्यानुसार, विमान भरकटले होते. शनिवार, 20 जानेवारीच्या रात्री हे विमान बदख्शानमधील झेबाक जिल्ह्यातील डोंगराळ भागात कोसळले. या विमानाची अद्याप ओळख पटलेली नाही. भारत सरकार आणि अफगाणिस्तान सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयाने ट्विटरवर पोस्ट केले की, हे भारतीय विमान नाही.Major plane crash in Afghanistan Passenger plane crashed reaction came from India



मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘अफगाणिस्तानमध्ये नुकताच घडलेला दुर्दैवी विमान अपघात हा भारतीय विमान किंवा नॉन-शेड्यूल (NSOP)/चार्टर विमान नाही. हे मोरोक्कन नोंदणीकृत छोटे विमान आहे. यापूर्वी अफगाण मीडियाने हे विमान भारतीय असल्याचा दावा केला होता.

बदख्शानच्या माहिती आणि संस्कृती विभागाचे प्रमुख जबिहुल्ला अमीरी यांनी सांगितले की, प्रवासी विमान बदख्शान प्रांतातील कुरान-मुंजन आणि झेबाक जिल्ह्यांसह तोफखाना पर्वतांमध्ये कोसळले. तपासासाठी एक पथक या भागात पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी विमानाला अपघात झाला.

Major plane crash in Afghanistan Passenger plane crashed reaction came from India

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात