भूकंपामुळे अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस, आतापर्यंत २ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू


सहा  गावे नष्ट झाली असून शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.

विशेष प्रतिनिधी

कंधार : अफगाणिस्तानात काल झालेल्या भीषण भूकंपामुळे प्रचंड विध्वंस झाला आहे. वृत्तसंस्था एपीने तालिबानच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, भूकंपामुळे आतापर्यंत देशात दोनन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर हजारो लोक जखमी झाले आहेत. Massive destruction in Afghanistan due to earthquake more than 2 thousand people died so far

हा भूकंप दोन दशकांतील सर्वात भयंकर भूकंपांपैकी एक आहे. तत्काळ मदतीचे आवाहन करताना देशाच्या माहिती आणि संस्कृती मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल वाहिद रायन यांनी सांगितले की, भूकंपामुळे सुमारे सहा  गावे नष्ट झाली असून शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.  देशातील ४६५ घरे जमीनदोस्त झाली असून १३५ घरांचे नुकसान झाले आहे.

मणिपूर हिंसाचारावर संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली चिंता; मानवाधिकार कार्यकर्त्याला सुरक्षा देण्याचे आवाहन

भूकंपाच्या संदर्भात संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे की, देशातील मृतांची संख्या आणखी वाढू शकते, कारण शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोसळलेल्या इमारतींखाली काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपत्ती प्राधिकरणाचे प्रवक्ते मोहम्मद अब्दुल्ला जान यांनी सांगितले की, हेरात प्रांतातील जेंडा जान जिल्ह्यातील चार गावांचे भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

Massive destruction in Afghanistan due to earthquake more than 2 thousand people died so far

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात