गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींचे केले अभिनंदन
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हवाई दलाच्या ९१ व्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी आणखी एका नव्या अध्यायाची भर पडली आहे. आज भारतीय हवाई दलाला नवा ध्वज मिळाला आहे. ७२नवर्षांनंतर हा बदल करण्यात आला आहे. हवाई दलाचे प्रमुख एअर मार्शल व्हीआर चौधरी यांनी परेड दरम्यान ध्वज बदलला आणि हवाई योद्ध्यांना शपथही दिली. Air Force Day Indian Air Force got a new flag on Air Force Day a historic change after 72 years
गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी 91 व्या वायुसेना स्थापना दिनानिमित्त सर्व भारतीय हवाई दलाच्या जवानांना शुभेच्छा दिल्या आणि या ऐतिहासिक बदलाबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदनही केले. भारतीय वायुसेनेने रविवारी सकाळी प्रयागराजमधील बमरौली हवाई दलाच्या स्थानकावर 91 व्या वर्धापन दिनाच्या समारंभाला सुरुवात केली.
डॉक्टरांनी साईनबोर्ड आणि घोषणांद्वारे जनतेची दिशाभूल करू नये; राष्ट्रीय वैद्यकीय आयोग म्हटले- केमिस्टच्या दुकानावर क्लिनिकचे पत्रक लावणेही चुकीचे
८ ऑक्टोबर १९३२ रोजी स्थापन झालेल्या देशाच्या सशस्त्र दलांमध्ये भारतीय वायुसेनेचा (IAF) अधिकृत समावेश वायुसेना दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी हा दिवस भारतीय हवाई दल प्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. युनायटेड किंगडमच्या रॉयल एअर फोर्ससाठी सहाय्यक दल म्हणून १९३२ मध्ये अधिकृतपणे हवाई दलाची स्थापना करण्यात आली आणि १०३३ मध्ये पहिले ऑपरेशनल स्क्वॉड्रन तयार करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App