जैसलमेरमध्ये मोठा अपघात! ‘BSF’चा ट्रक उलटल्याने एका जवानाचा मृत्यू, १२ हून अधिक जखमी


बीएसएफचे जवान भारत-पाकिस्तान सीमेवर सुरू असलेल्या अलर्टमध्ये सामील होणार होते.

विशेष प्रतिनिधी

जैसलमेर : राजस्थानमधील जैसलमेरमध्ये सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) ट्रक उलटल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात एका बीएसएफ जवानाचा मृत्यू झाला. त्याचवेळी 12 हून अधिक जवान जखमी झाले आहेत. जखमी बीएसएफ जवानांना शासकीय जवाहिर रुग्णालयात आणण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. Major accident in Jaisalmer BSF truck overturns one soldier killed more than 12 injured

बीएसएफचे अधिकारी रुग्णालयात पोहोचले आहेत. बीएसएफच्या 149 व्या बटालियनचे हे जवान असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या जवानाचे नाव एस. के. दुबे असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएफचे जवान भारत-पाकिस्तान सीमेवर सुरू असलेल्या अलर्टमध्ये सामील होणार होते, तेव्हा वाटेत ही मोठी दुर्घटना घडली. शाहगढ पोलीस स्टेशन हद्दीतील लंगतळाजवळ हा अपघात झाला.

Major accident in Jaisalmer BSF truck overturns one soldier killed more than 12 injured

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात