मणिपूरमध्ये सर्जिकल स्ट्राइकच हवा; भाजपच्या सहयोगी पक्षाच्या नेत्याची मागणी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मणिपूर गेल्या तीन महिन्यांपासून पेटलेले आहे. तिथल्या हिंसाचारात 150 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी राजकारण करत केंद्रातील मोदी सरकार विरुद्ध अविश्वास ठराव आणून पाहिला. पण तो अविश्वास ठराव पराभूत झाला. त्या अविश्वास ठरावाच्या चर्चेच्या वेळी काँग्रेस खासदार राहुल गांधींनी मणिपूरमध्ये लष्कर पाठवण्याची मागणी केली. पण ही मागणी करण्यापूर्वी ज्यांनी सरकारने मणिपूरात भारतमातेची हत्या केल्याचा अजब आरोप केला.A surgical strike is needed in Manipur; The demand of the leader of BJP’s allied party

या पार्श्वभूमीवर मणिपूर मधल्या परिस्थितीचे विशिष्ट आकलन करत भाजपच्या स्थानिक एनपीपी सहयोगी पक्षाचे स्थानिक नेते रामेश्वर सिंह यांनी मणिपूरमध्ये सर्जिकल स्ट्राइक सारखा परिणामकारक उपाययोजनाच हवी, अशी मागणी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तराचा हवाला त्यासाठी त्यांनी दिला आहे.



मणिपूरमध्ये केवळ स्थानिक कुकी अतिरेकी नाहीत, तर त्यांना परकीय शस्त्रांची मदत आणि पैशांची मदत होत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्स तस्करांचा देखील हात आहे. त्यामुळे मणिपूर मधला हिंसाचार कायमचा संपुष्टात आणण्यासाठी परिणामकारक उपाययोजना करण्याची गरज आहे, असे परखड मत रामेश्वर सिंह यांनी व्यक्त केले आहे. अमित शहा यांनी अविश्वास ठरावावर सरकारतर्फे उत्तर देताना केलेल्या भाषणात या सर्व मुद्द्यांचा सविस्तर ऊहापोह केला होता.

या पार्श्वभूमीवर मणिपूर मधला हिंसाचार कायमचा थांबवण्यासाठी रामेश्वर सिंह यांनी या परिणामकारक उपाययोजनांमध्ये सर्जिकल स्ट्राइकचा देखील समावेश केला आहे. ज्यावेळी स्थानिक कुकी अतिरेक्यांना परदेशातून मदत येते, परदेशातील घुसखोर मणिपूर सारख्या राज्यामध्ये काल येऊन हल्ले करतात त्यावेळी तो फक्त मणिपूर राज्याचा प्रश्न उरत नाही, तर तो राष्ट्रीय सुरक्षेला धोका उत्पन्न होतो म्हणून सर्जिकल स्ट्राइक सारखी परिणामकारक उपाययोजना सरकारने करावी अशी मागणी रामेश्वर सिंह यांनी केली आहे.

A surgical strike is needed in Manipur; The demand of the leader of BJP’s allied party

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात