विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीतील फुटी संदर्भात शरद पवारांनी अजित पवार यांनी तळ्यात मळ्यात भूमिका घेतली असली तरी त्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे महाराष्ट्रात विरोधी पक्षांची मोठी “पॉलिटिकल स्पेस” तयार होत आहे आणि ही स्पेस पूर्णपणे खेचून घेण्याचा काँग्रेसचा इरादा दिसून येत आहे. अमरावती पाठोपाठ नगर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर काँग्रेसने आपला दावा ठोकला आहे.Congress begins to pull the full space of the opposition; After Amravati, Congress claims both seats in the city
अमरावतीत सध्या नवनीत राणा या अपक्ष खासदार असल्या तरी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केंद्रात पाठिंबा दिला आहे आणि राज्यातही शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा देऊ केला आहे. अमरावतीत राणा दांपत्याची लढत राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहे. तरीदेखील काँग्रेस तिथे संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न करत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते पण दोन्ही पदे विदर्भाकडे गेल्याने विदर्भात काँग्रेसला अशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळेच अमरावतीची जागा काँग्रेस उमेदवाराकडे खेचून घेण्याची पक्षाची तयारी आहे.
तसेच नगर जिल्ह्यात शिर्डी आणि दक्षिण नगर या दोन्ही मतदारसंघांमध्ये सध्या भाजप शिवसेनेचे खासदार आहेत सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे यांच्याशी टक्कर घेण्याची तयारी काँग्रेस नेत्यांनी चालवली आहे. सुजय विखे यांचे आमदार रोहित पवारांशी सलोख्याचे संबंध आहेत. दोघांची एकत्र पोस्टर्स काही ठिकाणी झळकत आहेत. नगर जिल्ह्यातल्या नातेगोत्याच्या राजकारणात विखे सध्या वरचढ आहेत.
पण राष्ट्रवादी तिथे वेगवेगळ्या घराण्यांमध्ये विभागली गेल्याने पक्ष संघटना म्हणून कमकुवत झाली आहे आणि ती “पॉलिटिकल स्पेस” भरून काढण्याची संधी काँग्रेसला उपलब्ध झाली आहे.
अखंड काँग्रेस असताना नगर शहर आणि एक-दोन मतदारसंघ वगळता शिवसेना-भाजपने तिथे वर्चस्व निर्माण केले नव्हते. पण आता ती परिस्थिती नाही. काँग्रेस – राष्ट्रवादीचे दिग्गज भाजपने स्वतःकडे खेचून घेतले आहेत. खुद्द विखे पाटील हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. पण त्यामुळेच नगर जिल्ह्यात तयार झालेली विरोधी पक्षांची “पॉलिटिकल स्पेस” व्यापण्याची काँग्रेसने तयारी चालवली आहे.
पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार स्थानिक काँग्रेस संघटना दोन्ही लोकसभा जागांसाठी तयारी करत असल्याची माहिती काँग्रेसचे नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली आहे. याचा अर्थच काँग्रेसचा विदर्भाकडून पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेनेही आगेकूच करत आहे. कारण त्यांना राष्ट्रवादीने खाली केलेली विरोधी पक्षांची “पॉलिटिकल स्पेस” व्यापायची आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App