विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महात्मा गांधींची आज 155 वी जयंती आहे. या निमित्ताने देशभर आणि काही ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे कार्यक्रम आयोजित केले. गांधीजींच्या नावावर कुणी स्वच्छता अभियान राबविले, तर कोणी रॅली काढली. पण सगळ्यांनी मात्र एकमेकांना ठोकयची संधी सोडली नाही. Mahatma Gandhi’s 155th birth anniversary today
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांनी सर्व राज्यांमध्ये अनेक ठिकाणी स्वच्छता अभियानात भाग घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली अर्पण केल्यानंतर ते दिल्लीतल्या शाळेमध्ये स्वच्छता अभियानात सहभागी झाले. भाजपचे सर्व नेते अन्यत्र स्वच्छता अभियानात सामील झाले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मात्र त्यानंतर ते राजकीय टीकेकडेच वळले. महात्मा गांधींच्या नावावर देशात अनेकांनी वर्षानुवर्षे मते घेतली, पण त्यांचे स्वच्छते विषयीचे विचार ते विसरले. देशात 800 पेक्षा अधिक स्वच्छता अभियाने झाली. याचा उल्लेख मी मन की बात मध्ये केला होता. पण काही लोकांनी अस्वच्छतेलाच आपले जीवन मानले, असे शरसंधान पंतप्रधान मोदींनी काँग्रेसी प्रवृत्तीवर सोडले.
Dushyant Chautala : हरियाणा दुष्यंत चौटाला अन् खासदार चंद्रशेखर यांच्या ताफ्यावर दगडफेक
प्रियांका गांधी यांनी हरियाणा काँग्रेसच्या जिंद मधल्या प्रचार सभेत महात्मा गांधी जयंतीचा उल्लेख करून पंतप्रधान मोदींना भगवद्गीता “शिकवली”. महात्मा गांधींनी भगवद्गीतेच्या शिकवणीतून प्रेरणा घेत स्वतंत्रता आंदोलन चालविले, पण आज देशाचे सरकार हिंदुत्वाच्या नावाखाली जनतेचा रोज विश्वासघात करते, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबईत सद्भावना रॅली काढली. देशातला हिंसाचार आणि द्वेष मिटावा हा या रॅलीचा हेतू असल्याचे सांगितले गेले, परंतु प्रत्यक्षात महाराष्ट्र सरकारला घालवले पाहिजे. हे सरकार जनतेला नको आहे, असे टीकास्त्र सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी सोडले.
दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिश यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहिली. पण त्याचवेळी मोदी सरकारला लोकशाही विषयक भाषण देणे मात्र त्यांनी थांबविले नाही. प्रत्येक नेत्याने आपापल्या अजेंड्यानुसार महात्मा गांधींच्या जयंती निमित्ताचा वापर करून एकमेकांना ठोकल्याचे चित्र यातून दिसून आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more