गडचिरोलीतील एकाच कुटुंबांतील 5 जणांच्या खुनाने हादरला महाराष्ट्र, सूनच निघाली मारेकरी

प्रतिनिधी

गडचिरोली : एकाच कुटुंबातील पाच जणांची जेवणात विष कालवून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील महागाव येथे घडली आहे. अवघ्या 20 दिवसांत एकामागून एक मृत्यू होऊ लागल्याने संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.Maharashtra shaken by the murder of 5 people from the same family in Gadchiroli, daughter-in-law turned out to be the killer

पोलिसांनी या प्रकरणात तपास करत हत्याकांड घडवून आणणाऱ्या सुनेसह तिच्यासोबत असलेल्या आणखी एका महिलेस अटक केली आहे. दोघींनीही हत्या घडवून आणल्याची कबुली दिली.



गावात जादूटोण्याची अफवा

महागाव येथील लोकांना जादूटोण्याची भीती वाटू लागली, एकाच कुटुंबातील एकूण पाच जणांचा एकामागून एक मृत्यू झाला, हा मृत्यू संशयास्पद होता. त्यामुळे पोलिसांचा ताण वाढला, पोलिसांनी तपास सुरू केला, त्यानंतर तपासात धक्कादायक बाब समोर आली. सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. घरात सातत्याने होत असलेला जमिनीवरून वाद तसेच सासरकडील लोकांकडून मिळत असलेल्या टोमण्यांमुळे सुनेने अन्य एका महिलेच्या मदतीने घरातील सर्वांना विष देऊन संपविले.

तिघांवर उपचार सुरू

गेल्या काही दिवसांत अहेरी तालुक्यातील महागाव येथील शंकर पीरू कुंभारे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 4 जणांचा अचानक आजारी पडून मृत्यू झाला. अवघ्या वीस दिवसांत घरातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे व संशयाचे वातावरण निर्माण झाले होते.

असे घडले हत्याकांड…

20 सप्टेंबर रोजी शंकर कुंभारे व त्यांच्या पत्नी विजया कुंभारे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना अहेरी, त्यानंतर चंद्रपूर व शेवटी नागपूर येथील नामांकित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र 26 सप्टेंबर रोजी शंकर कुंभारे व त्यांच्या पत्नी विजया कुंभारे 27 सप्टेंबर रोजी यांचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला.

कुटुंबीय या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच गडहेरी येथे राहणारी त्यांची मुलगी कोमल दहागावकर व मुलगा रोशन कुंभारे आणि तेथे राहणारी शंकर कुंभारे यांची मुलगी आनंदा उर्फ ​​वर्षा उराडे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अनेक औषधोपचार करूनही त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. त्यापैकी कोमल दहागावकर यांचा 8 ऑक्टोबर रोजी, आनंदा उर्फ ​​वर्षा उराडे यांचा 14 ऑक्टोबर रोजी तर रोशन कुंभारे यांचा 15 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला.

व्यवसाय व नोकरीनिमित्त दिल्ली येथे राहणारे शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा सागर कुंभारे यांना घरातील लोकांचा मृत्यू झाल्याची माहित मिळाली. त्याने चंद्रपूर गाठले. सुरूवातीला आई-वडिलांच्या निधनानंतर तो दिल्लीला परतला असता त्याची देखील प्रकृती अचानक बिघडली आणि त्याला उपचारासाठी दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चालकाचीही प्रकृती बिघडली

शंकर कुंभारे व विजया कुंभारे यांना उपचारासाठी अहेरीला घेऊन गेलेले वाहनचालक राकेश मडावी यांनाही दुसऱ्या दिवसापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिवाय त्यांचे नातेवाईक रुग्णालयात दाखल असल्याने शंकर कुंभारे यांच्या भावजयीचा मुलगा त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर व नागपूर येथे आला असता तोही आजारी पडला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिघांची प्रकृती स्थिर असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

सर्वांची लक्षणे सारखीच

मृत झालेल्या पाच जणांमध्ये आणि सध्या उपचार घेत असलेल्या तिघांमध्ये हातपाय मुंग्या येणे, पाठीच्या खालच्या भागात आणि डोक्यात तीव्र वेदना, काळे झालेले ओठ आणि जड जीभ अशी समान लक्षणे दिसून आली. वरील लक्षणांच्या आधारे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुरुवातीला मृत व आजारी व्यक्तींना विषबाधा झाल्याचा अंदाज बांधला. परंतु त्यांच्या प्राथमिक तपासणीत विषाबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही.

एकाच कुटुंबातील पाच जणांच्या अकस्मात मृत्यूने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. तर सर्वत्र गावात भीतीदायक वातावरण तयार झाले होते. या हत्येचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी 4 वेगवेगळी पथके तयार करून महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातील विविध जिल्ह्यातून या हत्यांबाबत तपासाला सुरूवात केली.

सुनेने दिली कबुली

गुन्ह्याचा तपास सुरू असताना या गुन्ह्यात शंकर कुंभारे यांची सून संघमित्रा कुंभारे आणि त्यांच्या मेहुणीची पत्नी रोजा रामटेके यांचा सक्रिय सहभाग असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर कारवाई केली. त्यांच्यावर नजर ठेवून दोघींनाही 18 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले व त्यांची कसून चौकशी केली असता दोघींनीही पोलीस चौकशीत हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

Maharashtra shaken by the murder of 5 people from the same family in Gadchiroli, daughter-in-law turned out to be the killer

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात