महाराष्ट्रातील मंत्र्यांकडून कोरोना प्रतिबंधक लस पुरविली जात नसल्याचा कांगावा केला जात आहे. महाराष्ट्र आणि गैरभाजप शासित राज्यांना दुजाभावाची वागणूक दिल्याचा आरोप होत आहे.याला केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी चोख उत्तर दिले आहे. महाराष्ट्र आणि राजस्थान या गैरभाजप राज्यांनाच कोरोना प्रतिबंधक लसीचे सर्वाधिक डोस पुरविण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.Maharashtra has the highest supply of vaccines in the country, However, the ministers of the Maha Vikas Aghadi should call against the Center
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मंत्र्यांकडून कोरोना प्रतिबंधक लस पुरविली जात नसल्याचा कांगावा केला जात आहे. महाराष्ट्रा आणि गैरभाजप शासित राज्यांना दुजाभावाची वागणूक दिल्याचा आरोप होत आहे.
याला केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी चोख उत्तर दिले आहे.महाराष्ट्र आणि राजस्थान या गैरभाजप राज्यांनाच कोरोना प्रतिबंधक लसीचे सर्वाधिक डोस पुरविण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोरोना लसीच्या पुरवठ्याबाबतचे आरोप हे स्वत:च्या चुका लपविण्यासाठी केलेले आहेत, असेही हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. त्यांनी देशपातळीवरील पुरविण्यात आलेल्या कोरोना लसीची आकडेवारीच दिली आहे.
देशातील विविध राज्यांना सरासरी ३७ लाख ११ हजार लसींचे डोस पुरविण्यात आले. मात्र, महाराष्ट्रात रुग्णसंख्या जास्त असल्याने केंद्राने आत्तापर्यंत एक कोटी सहा लाख १९ हजार १९० डोस पुरविले आहे.
त्यापाठोपाठ गुजरातला एक कोटी पाच लाख १९ हजार ३३० आणि राजस्थानला एक कोटी चार लाख ९५ हजार ८६० डोस देण्यात आले आहेत. देशात सर्वाधिक डोस पुरवूनही महाराष्ट्राचे रडगाणे चालू आहे, असे हर्ष वर्धन यांनी सांगितले.
केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही महाराष्ट्र सरकारला सुनावलं आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात ५ लाख डोस तर वाया गेले. कारण नियोजनच व्यवस्थित केलं जात नाही, एका वायलमध्ये १० लोकांना डोस दिला जातो.
त्याचं व्यवस्थित नियोजन केलं जायला हवं. राज्य सरकार आपलं काम नीट करत नाही आणि दुसऱ्यांवर दोष देत आहे. हे म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाँटे अशी स्थिती आहे. कुठेही ३ ते ४ दिवसांचा साठा नेहमी असतोच. त्यापुढे तो येतच असतो. जेवढं तुम्ही लसीकरण करता, त्यापेक्षा जास्त डोस केंद्र सरकार देत असते.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसींचा पुरवठा कमी असल्याची तक्रार केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश जावडेकरांनी मात्र, राज्याकडे आजही ५ ते ६ दिवसांचा लसींचा साठा शिल्लक असल्याचा दावा केला आहे.
इतर बातम्या वाचा…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App