लवकरच अटक होऊन, भारतात आणण्याचा मार्गही होणार मोकळा.
विशेष प्रतिनिधी
महादेव बेटिंग ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याला लवकरच पकडून भारतात आणले जाऊ शकते. संयुक्त अरब अमिराती (यूएई) अधिकाऱ्यांनी चंद्राकरचे दुबईतील ठिकाण शोधून काढले असून त्याला नजरकैदेत ठेवले आहे.Mahadev betting app promoter Saurabh Chandrakar under house arrest in Dubai
चंद्रकर महादेव हा ऑनलाइन बेटिंग ॲपच्या दोन मुख्य आरोपी मालकांपैकी एक आहे. हे प्रकरण मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची चौकशी करत आहे. चंद्राकर दुबईतूनच आपला व्यवसाय चालवतो.
चंद्राकरला फ्लाइट रिस्क असल्याने बाहेर जाण्याची परवानगी नाही. विदेशी एजन्सीही त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. महादेव ॲप प्रकरण हा ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मचा समावेश असलेला हाय-प्रोफाइल घोटाळा आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे पोकर, पत्ते खेळ, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल आणि क्रिकेट अशा विविध खेळांमध्ये बेकायदेशीरपणे जुगार खेळण्याची संधी मिळते. हे ॲप वापरणारे बहुतेक लोक पराभूतच होत होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App