विशेष प्रतिनिधी
मेरठ : हस्तिनापूरमध्ये एक नवीन लढाई सुरू आहे आणि तिच्या केंद्रस्थानी द्रौपदी नाही, तर अर्चना गौतम आहे. काँग्रेसने अभिनेत्री, मॉडेल आणि सौंदर्य स्पर्धेतील विजेती असलेल्या गौतम यांचे नाव या मतदारसंघातून काँग्रेसने घोषित केल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर तिची बिकिनीमधील बोल्ड छायाचित्रे येऊ लागली. ‘Mahabharat’ of opposition from Congress’ bold bikini model candidate in Hastinapur
“एका प्राचीन व पवित्र शहरामधून तिच्या उमेदवारीमुळे हिंदू आणि जैन यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत,” असे म्हणत हिंदू महासभेने आता उडी घेतली आहे. “महाभारत काळातील हस्तिनापूर आहे. ते जैन तीर्थक्षेत्रदेखील आहे. विविध धर्माच्या अनुयायांकडून पूजनीय आहे. अशा मतदार संघात काँग्रेसने एका बिकिनी मॉडेलला उभे केले आहे, यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. तिची उमेदवारी मागे घेतली नाही तर आम्हाला आंदोलन करण्यास भाग पडेल,” असे हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक शर्मा म्हणाले.
“कोणताही व्यवसाय किंवा व्यक्तीच्या विरोधात काही नाही. परंतु एखाद्या पक्षाने आपल्या कृतींमुळे सामान्य जनतेला काय संदेश जाईल, याची काळजी घेतली पाहिजे,” असे भाजपचे पश्चिम उत्तर प्रदेश उपाध्यक्ष मनोज पोसवाल यांनी सांगितले.
गौतम (२६) यांनी अॅडल्ट कॉमेडी ‘ग्रेट ग्रँड मस्ती’मध्येही काम केलेली आहे. “मी याला फक्त ट्रोल करण्यापलीकडे काही मानत नाही. माझा जन्म हस्तिनापूर येथे झाला, ही माझी जन्मभूमी आहे. मला प्रदेशातील आणि बाहेरचा प्रदेश माहित आहे आणि म्हणूनच प्रियंका (गांधी) दीदींना मी योग्य वाटले. जे माझे बिकिनी घातलेले फोटो शेअर करत आहेत, त्यांनी स्वतःचे हलके, संकुचित मन उघड केले आहे. मी जे काही करते, त्याचा मला अभिमान आहे,” असे ही तरुण अभिनेत्री म्हणते. टीकेचे खंडन करताना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अलका लांबा म्हणाल्या, “स्त्रीला तिने पडद्यावर साकारलेल्या भूमिकेवरून किंवा त्यांनी निवडलेल्या व्यवसायावरून पारखणे चुकीचे आहे. अगदी स्मृती इराणी या ही मॉडेल होत्या. मला अर्चना गौतमला सांगायचे आहे की, तू स्थिर राहा आणि मेहनत करत रहा. ती जिंकली तर हा महिलांचा विजय असेल आणि प्रतिगामी विचारसरणीवरचा विजयही असेल.”
उत्तर प्रदेशातील हस्तिनापूर हे मेरठ जिल्ह्यातील गंगेच्या काठावर असलेले छोटे शहर आणि विधानसभा मतदारसंघ आहे. हे शहर महाभारतात नमूद केलेल्या कुरू राज्याची राजधानी शहर होती. पांडेश्वर आणि कर्ण मंदिरे यांसारख्या विविध धार्मिक स्थळांचे ते निवासस्थान आहे. तीन तीर्थंकरांचे जन्मस्थान असलेले हस्तिनापूर हे जैन धर्मीयांचे पवित्र केंद्र देखील आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App