विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची महाविकास आघाडीशी झालेल्या राजकीय संघर्षाच्या वादातून महाराष्ट्रात वादग्रस्त प्रतिमा जरूर बनली. पण त्यांचे 50 वर्षांपेक्षाही अधिक काळातले सार्वजनिक जीवन हे कमिटेड स्वयंसेवकाचे, कार्यकर्त्याचे आणि नेत्याचे राहिले आहे. Maha Vikas Aghadisi Struggle Due to Maharashtra Controversy Statue
2019 मध्ये भगतसिंह कोशियारी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी आल्यानंतर सत्ता संघर्षात ज्या नाट्यमय घडामोडी घडल्या, त्यातून महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि ठाकरे – पवार सरकार सत्तारूढ झाले. या सरकारशी भगतसिंह कोशियारी यांचे राजकीय नाते सुरुवातीपासूनच फारसे सौहार्दाचे राहिले नव्हते. भगतसिंह कोशियारी यांनी ठाकरे – पवार सरकारचे अनेक निर्णय कायद्याच्या कठोर कसोटीवर तपासून पाहून ते नाकारण्याची हिंमत दाखवली होती.
विधान परिषदेवर 12 आमदारांची नियुक्ती हा भगतसिंह कोशियारी आणि महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार यांच्यातल्या संघर्षाचा सर्वोच्च बिंदू ठरला होता. भगतसिंग कोशियारी यांनी ठाकरे – पवार सरकारची शिफारस स्वीकारून विधानपरिषदेवर बारा आमदार नियुक्त केले असते, तर महाविकास आघाडीशी त्यांचे नाते संपूर्ण सौहार्दाचे कदाचित राहिले नसते पण त्यामध्ये किमान संवादित्व तर नक्की राहिले असते. पण कोशियारी यांनी अखेरपर्यंत विधान परिषदेवर 12 आमदारांची नियुक्ती केली नाही. त्यानंतर अनेक वक्तव्यावरून त्यांना महाविकास आघाडी सतत घेरत राहिली. राजकीय कृतीमुळे कायदेशीर पातळीवर भगतसिंह पोशाख यांना महाविकास आघाडी धक्का लावू शकत नव्हती. त्यामुळे त्याचा राजकीय बदला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भगतसिंग कोशियारी यांची वक्तव्ये वादग्रस्त ठरवून घेतला. यात महाविकास आघाडीच्या नेत्यांना मराठी माध्यमांची देखील साथ मिळाली. त्यामुळेच आज जेव्हा भगतसिंग कोशियारी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून पायउतार होत आहेत, तेव्हा मराठी माध्यमातून वादग्रस्त राज्यपाल याच भाषेतले रिपोर्टिंग राहिले आहे.
पण कोशियारी यांच्या जीवनातला हा वादग्रस्ततेचा फार छोटा भाग आहे. त्यापेक्षा त्यांचे राजकीय आणि सार्वजनिक जीवन कितीतरी वेगळे आणि कमिटेड राहिले आहे. हेच ते भगतसिंह कोशियरी आहेत, जे वयाच्या 79 व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरीवर एखाद्या तरुणासारखे चढून गेले होते.
राज्यपाल भगतसिंह कोशियारींची पायउताराची तयारी; पंतप्रधानांकडे इच्छा व्यक्त
1942 मध्ये उत्तराखंड मधल्या कुमाऊ जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. शालेय जीवनातच त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला आणि त्यांच्या जीवनाला वेगळे वळण लागले. त्यांनी इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी मिळवली आणि काही काळ प्राध्यापकी केली. पण नंतरच्या काळात मात्र आपले सर्व जीवन त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि त्यानंतर भाजपला वाहून घेतले. उत्तराखंड मधल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला जनसंघ आणि नंतर भाजप रुजवण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा राहिला आहे. स्वतंत्र उत्तराखंड राज्याची निर्मिती झाल्यानंतर सन 2000 मध्ये नित्यानंद राय यांच्या मंत्रिमंडळाचे शिक्षण मंत्री होते. 2001 मध्ये ते उत्तराखंडचे दुसरे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने उत्तराखंडची निवडणूक जिंकली. पण भाजपने त्यांच्याविषयी वेगळा निर्णय घेतला. त्यांना राज्यसभेत नियुक्ती दिली. काही काळ त्यांना विजनवासातही सहन करावा लागला. पण या काळात देखील त्यांची राजकीय कमिटमेंट पक्ष आणि संघटनेशी कायम राहिली.
2019 मध्ये त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी केंद्रातील मोदी सरकारने सोपवली होती. त्यानंतर महाविकास आघाडीशी त्यांचा राजकीय संघर्षाचा सिलसिला सुरू झाला. त्यामुळे मराठी माध्यमांमध्ये फक्त या राजकीय संघर्षाचा आणि त्यांच्या विशिष्ट वादग्रस्त वक्तव्यांची चर्चा सध्या सुरू आहे. पण त्यांचे सार्वजनिक जीवन त्या पलिकडचे आणि विशेषतः कमिटेड स्वयंसेवक कार्यकर्ता आणि नेता असेच राहिले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App