प्रतिनिधी
मुंबई : देशात ऑनलाइन फूड डिलिव्हरीचे काम करणाऱ्या Zomato या कंपनीशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या महिन्यात झोमॅटो जवळपास 225 छोट्या शहरांमधून बाहेर पडली आहे. म्हणजेच आता झोमॅटोने या शहरांमधील व्यवसाय बंद केला आहे. कंपनीच्या डिसेंबर-तिमाहीच्या कमाईच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. जाणून घ्या काय आहे याच्याशी संबंधित नवीन अपडेट. Zomato wraps its operations in 225 cities Company’s losses increase 5 times, report reveals
कंपनीने भागधारकांना लिहिले पत्र
Zomato चे मुख्य वित्तीय अधिकारी अक्षांत गोयल यांनी कंपनीच्या भागधारकांना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यात आम्ही जवळपास 225 लहान शहरांमधून बाहेर पडलो आहोत, कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर तिमाही (Q3FY23) शी संबंधित अहवाल जारी केला आहे. ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यूच्या (GOV) 0.3 टक्के योगदान दिले आहे. गोयल यांनी भागधारकांना सांगितले की हे एक आव्हानात्मक वातावरण आहे, परंतु आम्ही अलीकडच्या आठवड्यात मागणीत सुधारणा पाहत आहोत, ज्यामुळे आम्हाला आत्मविश्वास मिळतो की सर्वात वाईट परिस्थिती संपली आहे.
झोमॅटो कर्मचाऱ्याला हिंदीचा आग्रह अंगलट , कंपनीला मागावी लागली माफी
1,000 हून अधिक शहरांमध्ये व्यवसाय
Zomato च्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या वर्षी 2021-22 मध्ये, कंपनी देशातील 1,000 हून अधिक शहरांमध्ये फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी व्यवसाय चालवत होती. जे आता मर्यादित झाले आहे. गोयल म्हणाले की, गेल्या काही तिमाहीत या (225) शहरांच्या खराब कामगिरीमुळे आम्हाला हे करावे लागले. या शहरांमधून आपले हात खेचले. या शहरांमधून बाहेर पडल्याने कंपनीच्या खर्चावर काही परिणाम होईल का. यासंदर्भात गोयल म्हणाले की, फारसा परिणाम होणार नाही.
कंपनीचा तोटा 5 पटींनी वाढला
गुरुग्रामस्थित झोमॅटो कंपनीचे म्हणणे आहे की ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत तिचा महसूल 75 टक्क्यांनी वाढून 1,948 कोटी रुपये झाला आहे. याच कंपनीचा तोटा 5 पटीने वाढून 346 कोटी रुपये झाला आहे. वर्ष-दर-वर्ष आधारावर, 31 डिसेंबर रोजी संपलेल्या 3 महिन्यांच्या कालावधीसाठी कंपनीच्या महसुलात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी Zomato ने सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत रु. 1,581 कोटी आणि डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत रु. 1,200 कोटींच्या तुलनेत रु. 1,565 कोटींचा समायोजित महसूल गाठला होता.
झोमॅटोच्या शेअर्समध्ये घसरण
Zomatoच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. शुक्रवारी सकाळी बीएसईवर कंपनीचा शेअर 1.47 टक्क्यांनी घसरून 53.60 रुपयांवर आला. NSE वर ते 1.38 टक्क्यांनी घसरून 53.65 रुपयांवर आले आहे. दरम्यान, बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 118.15 अंकांनी किंवा 0.19 टक्क्यांनी घसरून 60,688.07 वर व्यवहार करत होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App