जाणून घेऊयात वाघांच्या संख्येबाबत इतर राज्यांची स्थिती काय आहे?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतासह संपूर्ण जगाने आज(२९ जुलै) आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला. अशा स्थितीत केंद्र सरकारने देशात वाघांची संख्या किती? याबाबतची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार यावेळीही मध्य प्रदेशात वाघांची संख्या सर्वाधिक आहे. यासोबतच मध्य प्रदेशच्या डोक्यावर टायगर स्टेटचा मुकुट अबाधित आहे. Madhya Pradesh remains number one in terms of number of tigers
आकडेवारीनुसार, मध्य प्रदेशात 785 वाघ आहेत, जे मागील आकडेवारीपेक्षा 259 अधिक आहे. मध्य प्रदेशात 2020 नंतर 259 वाघ वाढले आहेत, तर कर्नाटक (563) आणि उत्तराखंड (560) जे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, ‘’आपल्या राज्यातील जनतेच्या सहकार्यामुळे आणि वनविभागाच्या अथक परिश्रमामुळे आपल्या राज्यातील वाघांची संख्या चार वर्षात 526 वरून 785 वर पोहोचली आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे.’’
याचबरोबर ‘’वन आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी केलेल्या सहकार्याबद्दल मी संपूर्ण राज्यातील जनतेचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन करतो. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त आपण सर्व मिळून भावी पिढ्यांसाठी निसर्ग संवर्धनाची शपथ घेऊया.’’ असं मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं.
मध्य प्रदेश केवळ वाघांच्या संख्येच्या बाबतीतच पुढे नाही, तर वाघांच्या सर्वाधिक संख्येतही वाढ झाली आहे. केंद्र सरकारने 2006 ते 2022 या कालावधीतील वाघांची आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार, मध्य प्रदेशात 485 वाघ वाढले आहेत, जिथे 2006 मध्ये राज्यात 300 वाघ होते, तर 2022 मध्ये ही संख्या 785 पर्यंत वाढली आहे.
कर्नाटक : वाघांच्या संख्येत कर्नाटकला दुसरे स्थान मिळाले आहे. येथे 563 वाघ आहेत. मात्र, वाघांची संख्या वाढविण्याच्या बाबतीत ते तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2006 च्या तुलनेत 273 वाघांची वाढ झाली आहे.
उत्तराखंड : वाघांच्या संख्येच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असले तरी वाघांची संख्या वाढवण्याच्या बाबतीत उत्तराखंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2006 पासून येथे 384 वाघ वाढले आहेत.
महाराष्ट्र: वाघांची संख्या आणि वाघांच्या वाढीच्या बाबतीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. येथे 444 वाघ आहेत, तर 2006 मध्ये 103 वाघ होते. महाराष्ट्रात 341 वाघ वाढले आहेत.
तामिळनाडू: तामिळनाडू 306 वाघांसह पाचव्या क्रमांकावर आहे, त्यात 306 वाघ आहेत. 2006 मध्ये राज्यात केवळ 76 वाघ होते. गेल्या 16 वर्षात येथे 230 वाघ वाढले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App