ठाकरे गटातून एकापाठोपाठ एक शिवसैनिकांची गळती; पण “भावी पंतप्रधानांची” पोस्टरवर चलती!!


विशेष प्रतिनिधी

नाशिक : ठाकरे गटातून एका पाठोपाठ एक गळती सुरू आहे, पण पोस्टरवर मात्र भावी पंतप्रधानांची चलती झाली आहे!! उद्धव ठाकरे गटातून एकेक शिवसैनिक, पदाधिकारी बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होत आहेत. पण उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक मधल्या त्यांच्या समर्थकांनी मात्र भारताच्या भगव्या नकाशात उद्धव ठाकरेंचा फोटो टाकून भावी पंतप्रधान म्हणून त्यांचे पोस्टर लावले आहे. राजकीय कार्यकर्त्यांचा हा आशावाद दुर्दम्य आहे. Shiv Sainiks drop out one after another from the Thackeray group

उद्धव ठाकरे यांनी कायदेशीर कसोटीवर शिवसेना गमावली आहे. त्यांचे मुख्यमंत्री पद तर आधीच गेले आहे. पण तरी देखील स्वतः उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे उर्वरित शिवसेनेची बांधणी करण्याचा मनसूबा राखून आहेत. पण हा मनसूबा राखत असताना उर्वरित शिवसेना अखंड ठेवण्यात अद्याप तरी त्यांना फारसे यश आलेले नाही. कारण संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिकांचा ओघ एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेच्या दिशेने जाताना दिसतो आहे.


विरोधी ऐक्याच्या बैठकीला पवार गैरहजर, उद्धव ठाकरे नाराज; संजय राऊत उतरले पवारांच्या समर्थनात!!


अगदी कालच मुंबईत स्थायी समितीचे माजी सदस्य सामटकर हे देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. काहीच दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि त्याआधी ठाकरे गटाच्या प्रवक्त्या विधान परिषद आमदार मनीषा कायंदे या शिंदे गटातच सामील झाल्या. उद्धव ठाकरेंना आपले आमदार आपल्याच गटात रोखून धरण्यात अपयश आले. नाशिक मधल्या शिवसैनिकांनी मात्र उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पद तर सोडाच, त्यांना थेट “भावी पंतप्रधान” म्हणून पोस्टरवर चढवले आहे!!

Shiv Sainiks drop out one after another from the Thackeray group

 

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*