Loksabha elections 2024 results : NDA झाले नाही 300 पार; काँग्रेसवाले पकवायला लागले INDI आघाडीचे खिचडी सरकार!!

Loksabha elections 2024 results :

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : NDA झाले नाही 300 पार, तोच काँग्रेसवाले पकवायला लागले INDI आघाडीचे खिचडी सरकार!!, अशा हालचाली राजधानी नवी दिल्लीत घडू लागल आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप अब की बार 370 पार आणि NDA 400 पारचा नारा दिला होता. प्रत्यक्षात भाजपला 272 आकडा गाठता आला नाही. NDA ला 300 आकडा गाठता आला नाही. त्या उलट काँग्रेसने 96 आकडा घातला आणि INDI आघाडीने 230 चा आकडा गाठला. त्यामुळे काँग्रेस आणि INDI आघाडीत प्रचंड उत्साह संचारला आणि त्यांनी राजधानी खिचडी सरकार पकवायला सुरुवात केली.

वास्तविक नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला अपेक्षित असणारे यश मिळाले नाही, हे खरे. भाजपने स्वतःचे बहुमत गमावले, हेही खरे, पण 242 जागा मिळवण्याच्या बेतातल्या भाजपला लोकसभेतला सर्वात मोठा पक्ष बनण्याचा मान मिळाला आहे. त्याचबरोबर मोदींच्याच नेतृत्वाखाली NDA पूर्ण बहुमत मिळून तो आकडा 296 पर्यंत गेला आहे. त्यामुळे मोदी सरकारने पूर्ण बहुमत मिळवलेच आहे.

पण मोदी सरकारला आता नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्याची गरज निर्माण झाली आहे. भाजप पूर्ण बहुमताज होता. त्यावेळेला कोणाच्याही पाठिंब्याची गरज नसताना भाजपने NDA आघाडीचा विस्तार करण्यासाठी आहेत, ते मित्रपक्ष टिकून नवे मित्र पक्ष जोडले. त्यात अजित पवारांसारखे एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेते आपल्याबरोबर जोडून घेतले. चंद्राबाबू नायडू यांच्याशी 10 वर्षांनंतर पुन्हा आघाडी केली. नितीश कुमार यांचे तळ्यात मळ्यात सहन करून नितीश कुमार यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी NDA मध्ये घेतले. परंतु या सगळ्याचा लाभ न होता भाजपला त्याचा आकड्यांच्या हिशेबात राजकीय तोटा झाल्याचे दिसते.

त्या उलट काँग्रेसला 54 वरून 96 पर्यंत उडी मारता आली. त्यामुळे काँग्रेस प्रणित INDI आघाडीमध्ये नवे चंद्रबळ संचारले. आघाडीची संख्या 228 पर्यंत गेल्याने काँग्रेसच्या सरकार स्थापनेच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. मोदींनी नव्याने उभ्या केलेल्या NDA मध्ये सेंधमारी करून चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना त्यांच्यापासून फोडायचे आणि INDI आघाडीत आणायचे, असा डाव दिल्लीत खेळला जात आहे. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश आणि पवन खेडा यांनी त्याचे सूतोवाच केले आहे.

जयराम रमेश यांनी तर त्यापुढे जाऊन भाजपला आणि NDA ला पूर्ण बहुमत मिळाले असले, तरी प्रत्यक्षात ते 400 पार गेले नाहीत म्हणून मोदींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

देशात मोदी 400 पार गेले नाहीत. भाजप 370 पार गेला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवीत होऊन काँग्रेस नेते आता चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना फोडून नवे सरकार बनवायची खिचडी पकवत आहेत. दरम्यानच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक एक हाती जिंकल्याबद्दल चंद्राबाबू नायडू यांचे अभिनंदन केले आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला आंध्र विधानसभेत 125 जागा मिळाल्या पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाला 20 जागा मिळाल्या आणि त्यांच्या बरोबर आघाडीत असलेल्या भाजपला 7 जागा मिळाल्या आहेत.

Loksabha elections 2024 results

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात