Loksabha elections 2024 results : भाजपला फटका, काँग्रेसने 90 ओलांडली, पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर पुनरुज्जीवन!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अब की बार 400 पार ही घोषणा देऊन भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणले असले तरी प्रत्यक्ष त्या निकालांमध्ये या घोषणेला मोठा फटका बसल्याचे दिसत असून काँग्रेसने टप्प्याटप्प्याने आपली कामगिरी उंचावत नव्वदी गाठली असून संपूर्ण देश पातळीवर काँग्रेसचे पुनरुज्जीवन झाले हे 2024 च्या निवडणूक निकालांचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य ठरले आहे. Loksabha elections 2024 results

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा काढली संपूर्ण देशभर ते 6200 किलोमीटर फिरले. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीतल्या निकालांवर सुरुवातीच्या कलांमध्ये तरी दिसत असून उत्तर प्रदेशात एकतर्फी वाटणारी निवडणूक भाजप समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्या चुरशीची झाली, तर महाराष्ट्रातले कल भाजपने अजित पवारांना आपल्या गोटात घेऊनही महायुती वाढवूनही महायुती विरोधात गेले. बंगालमध्ये भाजप आणि तृणमूळ काँग्रेस यांच्यातील चुरस वाढली दक्षिणेतल्या राज्यांमध्ये भाजपला मोठे यश मिळणे अपेक्षित असताना तिथे मर्यादित यश मिळाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रचाराचा दणका जोरदार उडवला होता. अबकी बार 400 पार ही घोषणा देऊन पंतप्रधान मोदींनी भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्यही भरले होते. त्यामुळे लोकसभेची निवडणूक एकतर्फी होईल. भाजप 370 पार जाईल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी 400 पार जाईल, असे वातावरण होते. परंतु, प्रत्यक्षात मतदारांनी मतदानाच्या कौलातून ते वातावरण फिरवून देशाला संतुलित कौल दिल्याचे दिसले.

2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये संपूर्ण देशभर प्रचंड मार खाल्लेल्या आणि पिछेहाट झालेल्या काँग्रेसचे पुनरुज्जीवन झाले. हे या निवडणुकीतले सगळ्यात मोठे वैशिष्ट्य ठरले. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मतदारांवर सकारात्मक परिणाम झाला हे खरे, परंतु तो तेवढ्या परिणामकारकपणे आकड्यांमध्ये दिसला नाही, हे देखील खरे. काँग्रेस 54 वरून 96 वर आली आणि कलांमध्ये ती 100 मध्ये पोहोचली हेच या निवडणुकीचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य ठरले.

BJP : 223

NDA : 292

Congress : 96

INDI : 172

Loksabha elections 2024 results

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात