Loksabha 2024 results : देशात 300 च्या आत फिरलेल्या भाजपला ओडिशा विधानसभेत बहुमत; आंध्रात भाजप + तेलगू देशम आघाडीचा प्रचंड विजय!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Loksabha 2024 results : अबकी बार 400 पार घोषणा फोल ठरून भाजप आणि राजकीय लोकशाही आघाडी 300 च्या आत फिरत असताना पूर्व आणि दक्षिणेकडील राज्यातून मात्र भाजपसाठी आनंद वार्ता आली आहे. ओडिशा सारख्या राज्यात भाजपने चमत्कार घडवत बहुमताचा आकडा ओलांडला आहे. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या बिजू जनता दल पक्षाला भाजपने फटका दिला असून भाजप 76, बिजू जनता दल 53, तर काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे. नवीन पटनायक यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागत आहे.

आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांची तेलगू देशम पार्टी आणि भाजप यांनी आघाडी केल्याने वाय एस आर काँग्रेसच्या जगन मोहन रेड्डी यांना सत्तेबाहेर जावे लागले आहे. तेलगू देशम आणि भाजप यांच्या आघाडीने बहुमताच्या दिशेने दमदार वाटचाल केली असून एकट्या तेलगू देशम पार्टीने 127 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यांच्याबरोबरच्या भाजपने 7 जागांवर, तर पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने 20 जागांवर आघाडी घेतली आहे. सत्ताधारी वाय एस आर काँग्रेस फक्त 21 जागांवर आघाडी घेऊ शकली आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा हा दारूण पराभव आहे.

देशात पंतप्रधान मोदींची 400 पारची घोषणा फोल ठरली. भाजप 2007 जागांवर आघाडीवर असून राष्ट्रीय लोकशाही आघाडी 297 तर काँग्रेस 96 जागांवर आघाडीवर असून “इंडिया” आघाडी 228 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे देशांमध्ये आता जनतेने संतुलित कौल दिल्याचे बोलले जात आहे.

Loksabha 2024 results

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात