लोकांनी बोगीतून उडी मारून जीव वाचवला.
विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमधील आराह येथे लोकमान्य टिळक स्पेशल ट्रेनच्या एसी बोगीला आग लागल्याचे वृत्त आहे. अनेक प्रवाशांनी ट्रेनमधून उडी मारून आपला जीव वाचवला. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ट्रेनच्या एसी बोगीमध्ये आग लागली.Lokmanya Tilak train caught fire in Bihars Arah
संपूर्ण घटना बिहारमधील भोजपूर अंतर्गत दानापूर-पंडित दीनदयाल उपाध्याय रेल्वे सेक्शनच्या करिसठ स्टेशनजवळ घडली आहे. जिथे होळी स्पेशल ट्रेनला आग लागली. ट्रेनच्या एसी बोगीला आग लागली. ०१४१० ही होळी स्पेशल ट्रेन दानापूरहून निघाली होती.
रात्री दोनच्या सुमारास दानापूरहून मुंबईला जाणाऱ्या होळी स्पेशल ट्रेनमध्येमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन ट्रेनच्या एसी बोगीला आग लागली. होळीमुळे ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या खूपच कमी होती, त्यामुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, रेल्वेने एक हेल्पलाइन क्रमांकही जारी केला असून त्यावर माहिती मिळू शकते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App