मध्य प्रदेशात काँग्रेसचे लॉलीपॉप; सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी ते महिलांना 500 रुपयांत गॅस!!

विशेष प्रतिनिधी

भोपाळ : कर्नाटक, राजस्थान, हिमाचल प्रदेश या तीनही राज्यांप्रमाणेच काँग्रेसने मध्य प्रदेशात देखील सत्तेवर येण्यासाठी लॉलीपॉप वाटपाला सुरुवात केली आहे. काँग्रेस मध्य प्रदेशात सत्तेवर आली, तर शेतकऱ्यांना कर्जमाफी, जातीय जनगणनेपासून ते महिलांना रुपयांत गॅस सिलेंडर पर्यंत वेगवेगळ्या घोषणांचे लॉलीपॉप काँग्रेसने जनतेपुढे ठेवले आहेत.Loan waiver for farmers to Rs 500 gas for women

काँग्रेसचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे हे मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर होते त्यांनी राज्य विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी काँग्रेसच्या संघटनेच्या तयारीचा आढावा घेतला. त्याचवेळी सतना येथे त्यांनी एका मेळाव्याला संबोधित करताना काँग्रेस मध्य प्रदेशात सत्तेवर आली, तर जनतेला काय देईल, याची यादी जाहीर केली. त्यात जातीय जनगणनेपासून ते 500 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर पर्यंतच्या विविध घोषणा आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना, प्रत्येक महिलेला दरमहा 1500 रुपये 100 युनिट पर्यंत वीज बिल नाही, यांचा समावेश आहे.



पण काँग्रेसच्या या घोषणांमध्ये जुने काही नाही. कारण अशाच घोषणा काँग्रेसने हिमाचल प्रदेश, राजस्थान, कर्नाटक विधानसभांच्या निवडणुकांमध्ये केल्या होत्या. मात्र त्याची पूर्तता करताना तिथल्या काँग्रेस सरकारची दमछाक झाली आणि त्यांनी केंद्रात सरकार पुढे हात पसरायला सुरुवात केली. हिमाचल प्रदेशात तर काँग्रेस सरकार सत्तेवर आल्याबरोबरच त्यांनी जुनी पेन्शन लागू केली. पण त्याचा परिणाम असा झाला की सध्या नोकरीत असलेल्या कर्मचाऱ्यांना पगार द्यायला राज्य सरकारकडे पैसा उरला नाही. त्यामुळे त्यांनी केंद्र सरकापुढे हात पसरले.

कर्नाटकात देखील त्याचेच रिपीटेशन झाले. वेगवेगळ्या मोफत योजनांच्या अंमलबजावणी करताना त्यांना एकतर स्थगिती द्यावी लागली किंवा त्यासाठी केंद्र सरकारपुढे हात पसरावे लागले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून कर्नाटक साठी स्पेशल पॅकेजची मागणी केली आहे.

एकीकडे जनतेला लुभावण्यासाठी प्रचंड मोफतच्या घोषणा करायच्या पण सत्तेवर आले की त्या राबवायला पैसे नसले की केंद्रापुढे हात पसरायचे हे काँग्रेसचे नवे धोरण झाले आहे. मध्य प्रदेशात देखील आगामी विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सरकार सत्तेवर आले तर असेच घडण्याची चिन्हे दिसत आहेत.

Loan waiver for farmers to Rs 500 gas for women

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात