सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : LMV license सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हलक्या मोटार वाहनाचा (एलएमव्ही) ड्रायव्हिंग लायसन्स असलेल्या व्यक्तींबाबत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने निर्णय दिला आहे की LMVचा ड्रायव्हिंग लायसन्स धारण केलेल्या व्यक्तीला 7,500 किलोपेक्षा कमी वजनाचे वाहतूक वाहन चालविण्याचा अधिकार आहे.LMV license
देशात रस्ते अपघात वाढण्यास एलएमव्ही परवानाधारक जबाबदार असल्याचे सिद्ध करणारा कोणताही डेटा उपलब्ध नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. सरन्यायाधीशांसह चार न्यायाधीशांच्या बाजूने निकाल लिहिताना न्यायमूर्ती हृषिकेश रॉय म्हणाले की, हा मुद्दा हलके मोटार वाहन परवानाधारक चालकांच्या उदरनिर्वाहाशी संबंधित आहे.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठाने हा निकाल दिला. या कायदेशीर प्रश्नामुळे LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारकांनी चालवलेल्या वाहतूक वाहनांच्या अपघात प्रकरणांमध्ये विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाईच्या दाव्यांवर वाद निर्माण झाला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App