Donald Trump हिंदूंच्या संरक्षणाची हमी; डोनाल्ड ट्रम्प विजयी; पंतप्रधान मोदी खुश, वाराणसीत जल्लोष!!

Donald Trump

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अमेरिकेसह जगभरातल्या हिंदूंच्या संरक्षणाची हमी देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय झाला त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी खुश झाले आणि वाराणसीत मोठा जल्लोष झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयासाठी आवश्यक असणारा इलेक्ट्रॉन कॉलेजमधला 270 चा आकडा ओलांडला त्यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचा निर्णायक पराभव केला. People in Varanasi celebrate as Republican candidate Donald Trump leads

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या संपूर्ण इलेक्शन कॅम्पेन मध्ये अमेरिकेतल्या तसेच जगातल्या हिंदूंच्या संरक्षणावर मोठा भर दिला होता. बांगलादेशामध्ये सत्तांतरादरम्यान झालेल्या हिंदू अत्याचारावर त्यांनी आवाज उठवला होता. त्यामुळे अमेरिकेतील भारतीयांचा संपूर्ण कौल डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने झुकला. त्यामुळे इलेक्ट्रॉन कॉलेज वोट्स आणि पॉप्युलर वॉट्स या दोन्ही मध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर राहिले त्यांनी अमेरिकन अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला.

 

 

 

डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय जाहीर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. ट्रम्प यांच्याबरोबरचे आपल्या बॉण्डिंगचे फोटो त्यांनी या ट्विटमध्ये आवर्जून वापरले. डोनाल्ड ट्रम्प यांची अध्यक्षपदाची दुसरी कारकीर्द भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांमध्ये नवी उंची गाठणारी ठरेल, असा आशावाद मोदींनी व्यक्त केला.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचे अमेरिकेमध्ये तर सेलिब्रेशन सुरू आहेच, त्याचबरोबर वाराणसी या मोदींच्या लोकसभा मतदारसंघात देखील मोठा जल्लोष झाला.

People in Varanasi celebrate as Republican candidate Donald Trump leads

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात