विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना दिवस पाळण्याचे जाहीर करताच त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असून त्यावर सोशल मीडियात भरपूर चर्चा होताना दिसते आहे.मोदी यांनी काँग्रेसला अडचणीचा ठरणारा विषय पुढे आणल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे, तर देशातल्या लिबरल्सच्या पोटात दुखले आहे.Liberals targets PM narendra modi as he declared partition horror remember day
काँग्रेसच्या नेत्यांनी मोदींवर टीका करणे स्वाभाविक आहे कारण मोदींनी एक प्रकारे त्यांच्या दुखर्या नसेवर हात ठेवला आहे.परंतु प्रताप भानु मेहता, अरुण शर्मा या लिबरल लेखकांनी मोदींवर वेगळ्या मुद्द्यावर टीका केली आहे. देश स्वातंत्र्याच्या 75 वर्षात असताना देशाच्या भविष्याचा विचार करायचा की फाळणीच्या वेळेच्या दुःखाला कुरवाळत बसायचे?,
असा सवाल प्रताप भानु मेहता यांनी इंडियन एक्सप्रेस मध्ये लेख लिहून केला आहे. पाकिस्तानने निर्मिती नंतर धर्मांध मार्ग चोखाळला परंतु भारताने धर्मनिरपेक्ष मार्ग चोखाळून देशाची वाटचाल प्रगतीकडे चालू ठेवली भारतात कधी स्वातंत्र्याचा गळा घोटला गेला परंतु देश कायम स्वातंत्र्य या मूल्यावर कायम राहिला आज स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात भारतीय व्यक्ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहेत का?, असा खोचक सवाल प्रताप भानु मेहता यांनी केला आहे
तर अरुण शर्मा यांनी काँग्रेसचे मुखपत्र असणाऱ्या नॅशनल हेराल्ड मध्ये मोदींवर टीका केली आहे. मोदी फाळणीचा विषय काढतात तेव्हा ते पंडित नेहरूंना जबाबदार धरतात. परंतु मूळात फाळणीसाठी जे बॅ. मोहम्मद अली जिन्ना जबाबदार आहेत त्यांच्या नावाचा ते उल्लेखही करत नाहीत, असे टीकास्त्र अरुण शर्मा यांनी सोडले आहे.
राष्ट्रवादीचे राज्यसभेचे माजी खासदार माजीद मेमन यांनी देखील फाळणी वेदनादायक होती हे खरे आहे परंतु आज त्याची कशासाठी आठवण काढायची? देशाच्या भविष्याचा विचार करून आपण पुढे गेले पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.
काँग्रेस नेत्यांना आणि काँग्रेसनिष्ठ विचारवंतांना फाळणी हा विषय नेहमीच कटू वाटत आला आहे. कारण देशावर संपूर्णपणे त्यांचे वर्चस्व असताना त्यांचे नेतृत्व अपयशी ठरल्याने भारताची फाळणी झाली. अशावेळी कोणीही फाळणीचा विषय काढला तर त्याची जबाबदारी काँग्रेसच्या त्या वेळच्या नेतृत्वावर येऊन पडते. त्यामुळे सध्याच्या काँग्रेसजनांमध्ये आणि काँग्रेसनिष्ठ विचारवंतांमध्ये फाळणीचा विषय काढताच अस्वस्थता पसरते. तशीच अस्वस्थतता प्रताप भानु मेहता, अरुण शर्मा, माजीद मेमन आदींनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App