जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठं यश जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांना अटक स्वातंत्र्य दिनापूर्वी हल्ल्याचा कट उधळला
वृत्तसंस्था
श्रीनगर: स्वतंत्र्य दिनाआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. स्वतंत्र्य दिनानिमित्तानं मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट उधळला आहे. पूर्ण देश स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याच्या तयारीमध्ये असताना जम्मू-काश्मीर पोलिसांनी एक मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला आहे. जैश-ए-मोहम्मदचे दहशतवाद्यांचा हल्ल्याचा मनसुबा हाणून पाडण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. जैश-ए-च्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला असून 4 दहशतवाद्यांना अटक केली आहे .Breaking News: Four Jaish terrorists arrested, plot hatched before Independence Day
Arrested JeM terrorist, Ijahar Khan was asked by a Pak-based commander to do reconnaissance of Panipat Oil Refinery which he did &sent videos to Pakistan. He was tasked to do reconnaissance of Ram Temple in Ayodhya but was arrested before he could accomplish this task: IGP, Jammu — ANI (@ANI) August 14, 2021
Arrested JeM terrorist, Ijahar Khan was asked by a Pak-based commander to do reconnaissance of Panipat Oil Refinery which he did &sent videos to Pakistan. He was tasked to do reconnaissance of Ram Temple in Ayodhya but was arrested before he could accomplish this task: IGP, Jammu
— ANI (@ANI) August 14, 2021
जम्मू -काश्मीर पोलिसांनी पकडलेले हे दहशतवादी मोटारसायकल IED वापरून स्वातंत्र्यदिनी हल्ला करण्याच्या तयारीत होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा मनसूबा मोडून पाडण्यात यश मिळालं. पोलिसांनी या दहशतवाद्यांसह त्यांच्या साथीदारांना अटक केली.
दहशतवाद्यांनी हल्ल्याची तयारी केली होती. ते ड्रोनमधून सोडलेली शस्त्रे जैशच्या सक्रिय दहशतवाद्यांकडे पोहोचवून हल्ल्यात मदत करत होते. 15 ऑगस्टच्या निमित्ताने ते मोटरसायकलला IED लावून हल्ला करण्याचा कट होता. यासाठी त्यांचं नियोजनही सुरू होतं. मात्र ह्या कटाची महिती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि त्यांनी हा कट उधळून लावला.
याआधी पंजाबच्या सीमेवर ड्रोन पकडण्यात आले होते. तर अनंतनागमध्ये देखील हल्ला घडवून आणण्यात आला होता. त्यामुळे पोलीस आणि सुरक्षा दल सतर्क होतं. जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट जारी करण्यात आला होता. जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांनी 4 दहशतवाद्यांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App