INDI आघाडीत प्रादेशिक नेत्यांनंतर आता कम्युनिस्टांचे वाग्बाण; राहुल गांधींना वायनाड मधून हाकलून देण्याचे “प्लॅन”!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडची सत्ता गमावल्यानंतर काँग्रेसची INDI आघाडीतली राजकीय वर्चस्वाची स्थिती तर कमकुवत झालीच आहे, पण त्या पलीकडे जाऊन आता राहुल गांधींची “सुरक्षित सीट” वायनाड वरही गंडांतर आले आहे. Left party leaders wants to drive away rahul gandhi from wayand constituency

3 राज्यांमधली सत्ता गमावल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह अनेक प्रादेशिक नेत्यांनी काँग्रेसवर तोंडसुख घेतले. तिन्ही राज्यांमध्ये INDI आघाडीतल्या घटक पक्षांना आपल्या बरोबर सामावून घेतले असते, तर काँग्रेसचे काय बिघडले असते??, तशीही काँग्रेस निवडणुकीत हरलीच ना, पण निदान INDI आघाडी म्हणून आपण एकत्र लढलो हे चित्र तरी निर्माण करता आले असते, अशा शब्दांमध्ये प्रादेशिक नेत्यांनी काँग्रेसचे वाभाडे काढले.

मध्य प्रदेशात अखिलेश यादवांच्या समाजवादी पार्टीने फक्त 5 – 7 जागा मागितल्या होत्या. बाकी ठिकाणी त्यांची अपेक्षा नव्हती. पण काँग्रेसने तेवढ्या देखील जागा त्यांना दिल्या नाहीत. त्यामुळे अखिलेश यादवांनी मध्य प्रदेशात 55 उमेदवार उभे केले. त्यापैकी त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही पण काँग्रेस हरल्यामुळे अखिलेश यादव यांना जोर चढून त्यांनी काँग्रेसवर तोंडसुख घेतले.

जे अखिलेश यादवांनी केले तेच ममता बॅनर्जींनी देखील केले. त्यांनी देखील काँग्रेसला आघाडी धर्म पाळता येत नाही, असा टोमणा हाणला. पण आत्तापर्यंत काँग्रेसवर फक्त प्रादेशिक नेत्यांनीच तोंडसुख घेतल्याचे दिसले, पण त्या पलीकडे जाऊन आता डाव्या पक्षांचे नेतेही काँग्रेस विरुद्ध बोलू लागले.

काँग्रेसने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ही राज्य गमावली, पण तेलंगणात सत्ता मिळाल्याने अब्रू वाचली, पण त्यामुळेच माध्यमांनी आणि काही नेत्यांनी उत्तर दक्षिण “डिव्हाइड” सुरू केला हा “डिव्हाइड” कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी हाणून पाडला. कम्युनिस्ट नेत्यांनी राहुल गांधींना वायनाड मधून हाकलून देण्याची तयारी सुरू केली आहे. राहुल गांधींना खरंच भाजपशी टक्कर घ्यायची असेल, तर त्यांनी केरळातल्या “सुरक्षित” मतदारसंघातून उभे न राहता भाजपच्या उमेदवारासमोर उभे राहावे, असे आव्हान केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव ए. गोविंदन यांनी दिले. पक्षाचे नेते डी. राजा यांनी देखील याच मुद्द्याला दुजोरा दिला. पिनराई विजयन तर त्या पलीकडे जाऊन हेही बोलून गेले की, काँग्रेस इतर पक्षांना भाजपची “बी टीम” म्हणून डिवचत असते. प्रत्यक्षात काँग्रेसच भाजपची “बी टीम” बनली आहे. भाजपशी समोरासमोर टक्कर घ्यायची असेल, तर राहुल गांधींनी भाजपच्या तगड्या उमेदवारासमोर उभे राहून निवडणूक लढवावी.

– राहुल गांधींना हाकलण्याची तयारी

कम्युनिस्ट पक्षांमधल्या या महत्त्वाच्या नेत्यांच्या या वक्तव्यामुळे राहुल गांधींना त्यांनी निवडलेला सुरक्षित मतदारसंघ वायनाड मधून हाकलून देण्याची डाव्या नेत्यांनी तयारी चालवल्याचे दिसून येते. कम्युनिस्ट पक्ष वायनाड मतदार संघात आपला उमेदवार उभा करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे 3 राज्यांमधल्या पराभवाने केवळ काँग्रेसलाच मोठा फटका दिला असे नाही, तर आता राहुल गांधींचा “सुरक्षित” मतदारसंघ वायनाडवरही या पराभवाने गंडांतर आणले आहे आणि INDI आघाडीतली दरार आणखी वाढवली आहे. INDI आघाडीचे रद्द झालेली बैठक उद्या होणे अपेक्षित आहे त्यामध्ये राहुल गांधींना सुरक्षित मतदारसंघ शोधणे यावर घामासान होण्याची शक्यता आहे.

Left party leaders wants to drive away rahul gandhi from wayand constituency

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub